Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोप येत नाही म्हणून तासनतास मोबाइल बघत जागता? झोप कमी झाली तर, बिघडेल सगळंच कारण..

रात्री झोप येत नाही म्हणून तासनतास मोबाइल बघत जागता? झोप कमी झाली तर, बिघडेल सगळंच कारण..

How To Fall Asleep Easily Tips for Goof Sound Sleep : रात्री गादीवर पडल्या पडल्या छान झोप लागावी आणि झोपेची गुणवत्ता सुधारावी यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 01:13 PM2023-05-08T13:13:52+5:302023-05-08T13:35:40+5:30

How To Fall Asleep Easily Tips for Goof Sound Sleep : रात्री गादीवर पडल्या पडल्या छान झोप लागावी आणि झोपेची गुणवत्ता सुधारावी यासाठी

How To Fall Asleep Easily Tips for Goof Sound Sleep : Are you staring at your mobile for hours because you can't sleep at night? It's wrong, for deep, restful sleep... | रात्री झोप येत नाही म्हणून तासनतास मोबाइल बघत जागता? झोप कमी झाली तर, बिघडेल सगळंच कारण..

रात्री झोप येत नाही म्हणून तासनतास मोबाइल बघत जागता? झोप कमी झाली तर, बिघडेल सगळंच कारण..

झोप ही आपल्या जीवनशैलीतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रात्री शांत आणि गाढ झोप झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. रोज आपल्याला किमान ७ ते ८ तासांची शांत झोप गरजेची असते. पण ही झोप मिळाली नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी थकवा येणे, अॅसिडीटी, डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्या उद्भवतात. मग आळस आल्यासारखे होते आणि कामाचा उत्साह राहत नाही. मोबाइलचे व्यसन, कामाचा ताण किंवा अन्य काही कारणांनी आपल्याला रात्री गादीवर पडल्या पडल्या शांत झोप लागत नाही (How To Fall Asleep Easily Tips for Goof Sound Sleep). 

(Image : Google)
(Image : Google)

झोप लागत नाही म्हणून आपण कित्येक तास मोबाइल स्क्रोल करत राहतो. यामुळे डोळ्यांना थकवा येऊन आपल्याला झोप लागेल असं आपल्याला वाटतं पण त्यामुळे डोळ्यांच्या, मानसिक, आरोग्याच्या इतर तक्रारी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री गादीवर पडल्या पडल्या छान झोप लागावी आणि झोपेची गुणवत्ता सुधारावी यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे असते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात त्या कोणत्या आणि कशा फॉलो करायच्या याविषयी...

१. रात्रीचे जेवण लवकर घेणे

ऑफीसच्या उशीराच्या वेळा, प्रवासात जाणारा वेळ, टीव्ही पाहणे किंवा इतर जबाबदाऱ्या यांमुळे आपण रात्रीचे जेवण अनेकदा ९ नंतर घेतो. मात्र उशीरा जेवल्याने पचनक्रियेमध्ये अडथळे येतात, अॅसिड रिफ्लक्स होते आणि त्यामुळे लवकर झोप येत नाही. पण आपण संध्याकाळी ७ च्या दरम्यान जेवण केले तर हे सगळे प्रश्न दूर राहतात आणि आपल्याला वेळेत झोप येऊ शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. झोपण्याच्या खोलीतले लाईटस 

अनेकांना रात्र झाली तरी झोपण्याच्या खोलीतले लाईटस लावून ठेवण्याची सवय असते. याशिवाय फोन, लॅपटॉप. टीव्ही यांसारख्या उपकरणांचे लाईटस असोत. या लाईटसमुळे आपल्या शरीरात निर्माण होणारे झोपेचे मेलाटोनिन हे हार्मोन्स दाबले जातात. यामुळे लवकर झोप तर येत नाहीच पण झोपेची गुणवत्ताही बिघडते. त्यामुळे शक्यतो झोपण्यापूर्वी खोलीतील सगळे लाईटस बंद राहतील असा प्रयत्न करायचा. 

३. बेडटाईम रुटीन फॉलो करा

प्रत्येकाने आपलं एक बेडटाईम रुटीन सेट करायला हवं आणि ते फॉलो करायला हवं. त्यामुळे मेंदूला रोजच्या रोज एका विशिष्ट वेळेत झोपायची सवय लागते. तसेच रात्री झोपताना वाचन, गाणी ऐकणे, आपल्या जवळच्या लोकांशी गप्पा मारणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. दुसऱ्या दिवशीचे नियोजन रात्री झोपताना करु नये, कारण त्यामुळे डोक्यात विचारांची गर्दी सुरू होते. 

Web Title: How To Fall Asleep Easily Tips for Goof Sound Sleep : Are you staring at your mobile for hours because you can't sleep at night? It's wrong, for deep, restful sleep...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.