कितीही थकवा आला तरी झोपच येत नाही हा त्रास अनेकांना जाणवतो. झोप न लागल्यामुळे अनेकजण मोबाईल घेऊन बसतात. त्यामुळे ८ तास पूर्ण झोप होत नाही आणि तब्येत खराब होण्याचाही धोका असतो. झोप लागण्यासाठी एक आयुर्वेदीक ट्रिक फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदीक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी अनिद्रा कमी करण्याचे काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत. (How Get Sleep Faster)
आयुर्वेदानुसार झोप लवकर येण्यासाठी एक सोपी पद्धत वापरल्यास शांत झोप येईल आणि डोकंही शांत राहील. या पद्धतीला पाद अभ्यंग (Pada Abhyanga) म्हणतात. आयुर्वेदात पायांची मसाज करण्याला अभ्यंग म्हणतात. याद्वारे मांसपेशींच्या वेदना, त्वचेचे आजार दूर होतात. यामुळे पायांना शक्ती मिळते आणि दोष संतुलित राहतात. पाद अभ्यंग पायांच्या नसा मजबूत करण्यासाठी, विविध अवयवांना ताकद देण्यासाठी फायदेशीर ठरते. (How to fall asleep quickly and naturally)
यामुळे चांगली झोप येऊन, रक्त परिसंचयन सुधारण्यास मदत होते. यासाठी काही सोप्या पद्धती आहेत, ज्या तुम्ही घरी सहज करू शकता. प्रथम बोटांच्या टिपा दाबा, तुमचा एक पाय हलवा आणि कंपन करा, आता दोन्ही हातांचा वापर करून पायाच्या स्नायूंना दोन्ही बाजूंनी दाब द्या. प्रथम एका पायाने सुरुवात करा, पाय आणि तळव्यांना तेल लावून चांगले चोळा.
छातीत जळजळ, गॅसमुळे जेवण जात नाही? डॉक्टरांनी सांगितले 3 उपाय, पोटाचे त्रासच होतील लांब
पाय घट्ट धरा आणि आराम करण्यासाठी सोडा. यानंतर हळूहळू चोळा. ज्या बाजूने तुम्ही पाय घासत आहात. दुसऱ्या बाजूने पाय धरा. पायाच्या बोटांनी सोलचे सर्व पॉईंट्स दाबा. तुमचे पाय क्लॉकवाईज आणि त्यानंतर एंटी क्लॉकवाईज फिरवा.