Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवसभर दमल्यानंतरही रात्री लवकर झोपच येत नाही? ५ टिप्स, शांतपणे झोपाल, दिवसा फ्रेश राहाल

दिवसभर दमल्यानंतरही रात्री लवकर झोपच येत नाही? ५ टिप्स, शांतपणे झोपाल, दिवसा फ्रेश राहाल

How To Fall Asleep Fast : आपण बैठ्या जीवनशैलीमुळे सुर्यप्रकाशापासून लांब राहतो. यामुळे मेलेटोनिन हार्मोनचं उत्पादन कमी होतं आणि लवकर झोप लागण्यास अडथळे येतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:48 AM2023-01-10T11:48:56+5:302023-01-10T13:07:41+5:30

How To Fall Asleep Fast : आपण बैठ्या जीवनशैलीमुळे सुर्यप्रकाशापासून लांब राहतो. यामुळे मेलेटोनिन हार्मोनचं उत्पादन कमी होतं आणि लवकर झोप लागण्यास अडथळे येतात. 

How To Fall Asleep Fast : Nutritionist lovneet batra shared 5 habits that destroy you sleep | दिवसभर दमल्यानंतरही रात्री लवकर झोपच येत नाही? ५ टिप्स, शांतपणे झोपाल, दिवसा फ्रेश राहाल

दिवसभर दमल्यानंतरही रात्री लवकर झोपच येत नाही? ५ टिप्स, शांतपणे झोपाल, दिवसा फ्रेश राहाल

झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. रोज चांगली झोप घेतल्यानं तब्येत चांगली राहते. कमी झोप झाल्यानं आजार उद्भवतात. म्हणूनच ७ ते ८ तासांची झोप घेणं  गरजेचं आहे.  कितीही थकवा असेल तरी अनेकांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही.  या समस्येला इन्सोम्निया म्हणतात. म्हणतात. (How To Fall Asleep Fast) न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी सांगितलं की दिवसभर एक्टिव्ह राहण्यासाठी रात्री ६ ते ८ तासांची झोप आवश्यक हे. बरेच लोक पुरेशी झोप घेत नाही. एक्सपर्ट्सच्या मते रात्री झोप न येण्याला  तुमच्या रोजच्या सवयी जबाबदार असतात. (Nutritionist lovneet batra shared 5 habits that destroy you sleep)

 झोपायला गेल्यानंतर मोबाईल फोनचा वापर टाळा

बरेचसे लोक मोबाईलवर चित्रपट पाहणं पसंत करतात.  डिव्हाईसचा अतिवापर तुमच्या तब्येतीसाठी नुकसानकारक ठरु शकतो. फोनमधून निघणारी किरणं डोळ्यांसाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे व्यवस्थित झोप येत नाही. हा प्रकाश मेलेनिन प्रोडक्शन कमी करतो. यामुळे अनिद्रा, चिडचिड आणि रात्री लवकर झोप न येणं असे त्रास उद्भवतात. 

रात्रीचं जेवण हलकं घ्या

दुपारचं जेवण हेवी आणि रात्रीचं जेवण  हलकं घ्या. रात्री पचायला जड असे पदार्थ खाल्ल्यास त्याचं फॅट्समध्ये रुपांतर होतं. यामुळे पचनक्रिया संथगतीनं होते. अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळे रात्री पचायला हलक असेल असं जेवण घ्या. 

कॅफिनयुक्त पदार्थ घेऊ नका

शरीराला एक्टिव्ह ठेवण्यासाठी रात्री कॅफेनयुक्त पदार्थ टाळा. कारण जर झोपण्यापूर्वी तुम्ही चहा, कॉफी अशा पदार्थांचे सेवन केले तर झोप खराब होऊ शकते. 

नैसर्गिक प्रकाशात राहा

तज्ज्ञ सांगतात की, आपण बैठ्या जीवनशैलीमुळे सुर्यप्रकाशापासून लांब राहतो. यामुळे मेलेटोनिन हार्मोनचं उत्पादन कमी होतं आणि लवकर झोप लागण्यास अडथळे येतात. 

तणावमुक्त वातावरणात राहा

ताण तणाव आणि झोप यांचा परस्परांशी संबंध असतो. जर तुम्ही टेंशनमध्ये असाल तर व्यवस्थित झोप येणार नाही. दिवसभर ताण तणाव असल्यासारखं वाटेल.  म्हणूनच डिप्रेशन किंवा तणावग्रस्त असलेल्या लोकांना झोपेच्या  गोळ्या दिल्या जातात.  

Web Title: How To Fall Asleep Fast : Nutritionist lovneet batra shared 5 habits that destroy you sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.