Join us   

रात्ररात्र तळमळता-झोपच नाही? डॉक्टर सांगतात, लाइट बंद करण्याची खास युक्ती- मन होईल शांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 6:03 PM

How to fall asleep faster & sleep better try this super effective sleep hack recommended by psychiatrist : How to fall asleep faster and sleep better : झोपण्याआधी लाईट बंद करण्याचे काही नियम लक्षात ठेवले तर झोप होईल मस्त...

रात्रीची झोप ही खूप महत्वाची असते. रात्री किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. जर आपली रात्रीची झोप चांगली झाली तरच आपला दुसरा दिवशी अतिशय आनंदात,उत्साहात आणि फ्रेश जातो. रात्रीची शांत, सलग झोप मिळाल्यास आरोग्याच्या बहुतांश तक्रारी दूर होतात. रात्रीची झोप जर का अधुरी झाली तर दुसरा संपूर्ण दिवस हा आळसात निघून जातो, यामुळे दिवसभर थकल्यासारखे होते. कारण काहीही केलं तरीही रात्रीची झोप म्हणजे आपलं शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. असे असले तरीही बऱ्याचजणांना रात्री शांत झोप येत नाही. काहीवेळा कधीतरी फार उशिरा थोड्या वेळासाठी डोळा लागतो आणि मग परत जाग येते(How to fall asleep faster and sleep better).

रात्रभर अशी तुटक झोप झाल्याने आपली चिडचिड होते, कंटाळा येतो. अशावेळी अंथरुणात पडल्या पडल्या झोप यावी यासाठी काय करता येईल असे अनेक विचार आपल्या डोक्यात येतात. खरंतर झोपण्यापूर्वी आपण काही अशा चुकीच्या गोष्टी करतो की ज्याने त्याचा थेट परिणाम हा आपल्या झोपेवर होतो. झोपण्यापूर्वी अशा लहान - सहान चुका केल्याने आपल्याला आयत्यावेळी झोपच लागत नाही. झोपण्यापूर्वी आपण शक्यतो बेडरूममधील सगळ्या लाईट्स बंद करुन काळोख करुन झोपतो, तर काहींना लाईट चालू ठेवूनच झोपण्याची सवय असते. झोपण्यापूर्वी लाईट बंद करण्याच्या योग्य पद्धतीवर देखील आपली झोप अवलंबून असते. झोपण्याआधी लाईट बंद करण्याचे काही नियम आपण लक्षात ठेवले पाहिजे. हेल्थस्प्रिंग क्लिनिकच्या मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी झोपण्यापूर्वी लाईट बंद करण्याचे काही नियम सांगितले आहेत. हे नियम फॉलो केल्याने आपल्या झोपेवर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल त्याचबरोबर आपल्याला शांत झोप लागण्यास देखील मदत होईल(How to fall asleep faster & sleep better try this super effective sleep hack recommended by psychiatrist).

झोपण्यापूर्वी लाईट बंद करताना... 

  डॉ. सागर मुंदडा यांच्या मते, झोपण्यापूर्वी लाईट बंद करण्याच्या प्रोसेसचा देखील आपल्या झोपेवर थेट परिणाम होत असतो. झोपण्याच्या १ तास आधी तुम्हाला ही प्रक्रिया सुरू करावी लागेल. यासाठी समजा तुम्हाला रात्री १० वाजता झोपायचे आहे आणि तुमच्या बेडरूममध्ये ४ लाईट्स चालू आहेत. अशावेळी  तुमच्या खोलीतील ४ लाइट्सपैकी १ लाईट रात्री ९ : १५ वाजता बंद करावा. त्यानंतर ९ : ३० वाजता दुसरी लाईट बंद करावी. तसेच ९ : ४५ वाजता तिसरी लाईट बंद करावी. असे पंधरा मिनिटांच्या अंतरावर बेडरूम मधील एक एक लाईट हळुहळु बंद करावा. शेवटी, झोपण्याच्या १ मिनिट आधी, आपण चौथा लाईट देखील बंद केला पाहिजे.

विचारांचं काहूर - झोपेचं खोबरं , तुम्हांलाही आहे का 'नाईट एन्झायटी'? ५ सोपे उपाय, झोप लागेल शांत... 

खरंतर, जेव्हा आपण हळुहळु बेडरुम मधील लाईट्स बंद करतो तेव्हा नकळतपणे आपण खोलीतील प्रकाश हळूहळू कमी करत असतो. तेव्हा आपले झोपेचे चक्र आणि शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक सूर्यास्तासारखे काहीतरी घडत असल्याचा संदेश आपल्या मेंदू आणि शरीराला  देतात. कारण शतकानुशतके आपल्या शरीराची रचना ही सूर्याप्रमाणे कार्य करण्यासाठी केली गेली आहे. त्यामुळे अशा स्थितीत तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत मिळते आणि शेवटचा लाईट बंद करून तुम्ही झोपायला गेल्यावर लगेच झोप लागते. 

झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण ते मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे?

ही चूक आपण नेहमी करतो... 

याउलट, आपण शक्यतो झोपायच्या आधी अचानक खोलीतील सर्व लाईट्स बंद करतो. पण यात अडचण अशी आहे की बेडरूम मधील प्रकाश अचानक गायब झाल्यामुळे आपल्या मेंदूतील फियर सेंटर सक्रिय होते. यामुळे आपल्या मेंदूतील अमिग्डाला नावाच्या भागाला संदेश मिळतो की काहीतरी गडबड आहे, त्यामुळे सर्व प्रकाश निघून जाऊन काळोख झाला आहे. यामुळे झोपण्यापूर्वी आपला मेंदू रिलॅक्स होण्याऐवजी अ‍ॅक्टिव्ह  होतो. त्यामुळे जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल, तर बेडरुम मधील प्रकाश हळुहळु कमी करण्याच्या पद्धतीचा वापर करू शकता. यामुळे तुमची झोप सुधारण्यास अधिक मदत होऊ शकते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स