Join us   

पीठ म्हणून भुसा खाता? FSSAI म्हणते, फक्त १ ग्लास पाणी घेऊन ओळखा भेसळ; अन्यथा वजन वाढेल आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 6:09 PM

How To Find out if You Bought Adulterated Wheat Flour? FSSAI shared 1 simple trick : घरातल्या गव्हाच्या पिठात भेसळ तर नाही ना?

तांदळानंतर गव्हाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते (Wheat Flour). कारण भातानंतर लोक चपाती जास्त प्रमाणात खातात (Chapati). गव्हाचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते (Adulteration). गव्हाची चपाती खाल्ल्याने पचनक्रिया सुधारणे, वजन कमी करण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास, शरीराला ऊर्जा देण्यास आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यास मदत होते.

गव्हाच्या पिठात व्हिटॅमिन बी, आयर्न आणि मॅग्नेशियमसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. परंतु, गव्हाच्या पिठात भेसळ नसावी. अनेकवेळा व्यापारी गव्हाच्या पिठात कोंडा मिक्स करतात. कोंडा पौष्टीक आणि फायबरने समृद्ध आहे. परंतु गव्हाच्या पिठात निकृष्ट दर्जाचा कोंडा मिसळल्यास, पिठाची गुणवत्ता, पोषक घटक, पोत आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो(How To Find out if You Bought Adulterated Wheat Flour? FSSAI shared 1 simple trick).

गव्हाच्या पिठात निकृष्ट दर्जाचा कोंडा मिसळण्याचे तोटे

चवीमध्ये बदल

पिठात कोंडा जास्त प्रमाणात घातल्याने, पचनसंस्थेत अडथळे येतात.  इतकंच नाही तर त्यामुळे पिठातील पोषक घटक कमी होऊ शकतात. भेसळयुक्त पीठाचे पोत वेगळे असते. शिवाय चवीमध्येही बदल जाणवते. हे पीठ किंचित चवीला कडू लागते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

पचन समस्या

जास्त प्रमाणात कोंडा खाल्ल्याने पोटात गॅस, पोट फुगणे यासह पचनाच्या इतर समस्या निर्माण होतात. जर आपल्याला पचनाचा त्रास असेल तर, भेसळयुक्त गव्हाचं पीठ खाणं टाळा.

पोषक तत्वांचे शोषण कमी

भुसामध्ये आढळणारे फायटेट्ससारखे घटक कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांशी बांधले जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे शरीरात शोषण कमी होते. दीर्घकाळापर्यंत जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते.

वजन आणि ब्लड शुगर वाढते

भेसळयुक्त पीठ हे शुद्ध गव्हाच्या पिठाइतके पौष्टिक नसते, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि भूक लवकर लागते. ज्यामुळे जास्त खाणे आणि वजन वाढण्याचा धोका असतो.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

गव्हाच्या पिठात भेसळ कशी ओळखावी

एफएसएसआयनुसार, गव्हाच्या पीठातील भेसळ ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्या. पाण्यावर थोडे पीठ शिंपडा. ते चमच्याने चांगले मिसळा. पिठात भेसळ नसेल तर भुसाचे काही भाग पाण्यावर तरंगताना दिसतील. जर जास्त प्रमाणात पाण्यावर भुसा तरंगताना दिसत असेल तर, समजून जा, त्यात भेसळ केली गेली आहे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सअन्नफिटनेस टिप्स