आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात एक ना एक घोरणारी व्यक्ती असतेच. त्या व्यक्तीच्या घोरण्याच्या आवाजाने रात्री घरातील इतर व्यक्तींची झोप मोड होते. अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. झोपेत अशा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. घोरणे म्हणजे श्वासोच्छवास करताना येणारा एक प्रकारचा मोठा आवाजच असतो. घोरण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते. झोपेत असताना श्वासोच्छवासात काहीसा अडथळा निर्माण झाल्यामुळे घोरण्याची समस्या उद्भवते. काहीवेळा या घोरण्याचे स्वरूप अधिक तीव्र आजाराचे लक्षण असू शकते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात.
घोरणे ही अगदी सामान्य गोष्ट असली तरी त्याचा त्रास स्वत: घोरणाऱ्यालाच होतो असे नाही तर भोवतालच्या लोकांनाही होतो. त्या एका व्यक्तीमुळे भोवतालच्या लोकांची झोपमोड होऊन त्रास होतोच. जवळ जवळ अर्धी मोठी माणसे घोरतात आणि त्याचा त्रास होतो त्यामुळे याकडे लक्ष देणे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. घोरण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण अनेक उपायांचा वापर करून पाहतो परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला आपल्याला पहायला मिळत नाही. आपण आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा बदल केला तर या घोरण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. योगतज्ज्ञ जुही कपूरने घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी एक साधासुधा योग प्रकार सांगितला आहे. काय आहे तो नेमका योग प्रकार ते पाहूयात(How to find relief from snoring with this mudra).
घोरण्याची समस्या कमी करण्यासाठीची आदि मुद्रा :-
१. आदि मुद्रा करण्यासाठी, शांत स्थितीत आरामदायी मुद्रेत मंडी घालून जमिनीवर बसा.
२. डोळे बंद करा आणि मन शांत करा.
३. हात जोडून घ्या.
४. तुमचे लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा.
५. यानंतर हात मुठीप्रमाणे बंद करा.
६. परंतु हाताचे अंगठे आतील बाजूस ठेवून मगच मूठ बंद करावी.
७. आपण ही योग मुद्रा १५ ते २० मिनिटांसाठी करू शकता.
मासिक पाळीत झोपच येत नाही? पोटदुखी-हेवी ब्लिडिंग? ८ सोप्या गोष्टी, झोपा शांत...
पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?
घोरण्याच्या समस्येवर आदि मुद्रेचा फायदा कसा होतो ?
१. आदिमुद्रेच्या सरावाने फुफ्फुसाची जळजळ कमी होण्यास मदत होते. या योगासनामुळे तुमची श्वसन प्रणाली मजबूत होण्यास मदत होते. यामुळे श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसांची जळजळ कमी होण्यास मदत होते.
२. आदि मुद्रा फुफ्फुस आणि श्वसन प्रणालीचे संक्रमण कमी करण्यास मदत करते. या मुद्रेद्वारे ऊर्जेची पातळी सुधारते. यामुळे ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारखे श्वसनमार्गाचे आजार कमी होण्यास मदत होते.
३. श्वसनसंस्थेतील संसर्गामुळे सर्दी आणि घशाचा त्रास होऊ शकतो. या समस्येत आपण आदिमुद्रेचा सराव करू शकता. ही मुद्रा आपला संसर्ग कमी करण्यासाठी आणि सर्दी इत्यादी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
४. आदि मुद्रा ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. यामुळे आपल्याला मनःशांती मिळते. श्वासोच्छवासाची यंत्रणा उत्तम असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहते. त्यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि यामुळे आपली चिंता आणि तणावापासून सुटका होते.