Join us   

ताप आल्याने तोंड कडू पडलं- काही खाण्याची इच्छाच नाही? तोंडाला चव येण्यासाठी ३ पदार्थ खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 3:56 PM

Food Tips: ताप आल्याने तोंडची चव गेली असेल, तोंड कडू पडलं असेल तर हे काही पदार्थ खायला पाहिजेत... (how to get back taste sense that has lost due to high fever)

ठळक मुद्दे असं झालं तर मग अजिबातच जेवण जात नाही आणि रुग्णांना आणखीनच अशक्तपणा येतो. म्हणूनच अशावेळी रुग्णांना काही पदार्थ आवर्जून खायला द्यावेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्दी, ताप असे आजार घरोघरी दिसून येतात. हे आजार संसर्गजन्य असल्याने घरात एका व्यक्तीला इन्फेक्शन झालं की आपोआपच ते घरातल्या सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचतं. २- ३ दिवस अंगात ताप राहिल्यास तोंड कडू पडतं. काही खाण्याची इच्छा होत नाही. सर्दी झाल्यावरही बऱ्याचदा तोंडाची चव गेल्यासारखं होतं. असं झालं तर मग अजिबातच जेवण जात नाही आणि रुग्णांना आणखीनच अशक्तपणा येतो. म्हणूनच अशावेळी रुग्णांना काही पदार्थ आवर्जून खायला द्यावेत. यामुळे तोंडाला चव येईल आणि जेवणाची, काही खाण्याची इच्छा होईल. (how to get back taste sense that has lost due to high fever)

तापेमुळे तोंड कडू पडलं, तोंडाची चव गेल्यास उपाय

 

१. लिंबाचं लोणचं

लिंबाचं छान मुरलेलं लोणचं अधिक पाचक असतं. त्यामुळे तोंडची चव गेली असेल तर तोंडी लावायला लिंबाचं लोणचं आवर्जून घेऊन पाहा. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी देखील असतं.

न घासता १० मिनिटांत वॉशिंग मशिन होईल नव्यासारखं चकाचक, बघा स्वच्छता करण्याची सोपी ट्रिक

त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच चयापचय क्रियाही सुधारते. त्यामुळे तोंडाची चव गेलेल्या रुग्णांना लिंबाचं लोणचं खायला द्या. 

 

२. लसूणाची चटणी 

ताेंडाला छान चव येण्यासाठी लसूणही अतिशय उपयोगी ठरतो. यासाठी खोबऱ्याची लसूण घालून चटणी करा आणि पोळीसोबत ती खायला द्या. किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला द्या.

पावसाळ्यात बिस्किटं सादळतात, मीठ ओलसर होते? अन्न- धान्य साठवून ठेवण्यासाठी ५ स्मार्ट किचन टिप्स

एखाद्या तव्यावर तेल टाकून ७ ते ८ लसूण पाकळ्या आणि एखादी मिरची असं परतून घ्या. त्यात मीठ टाकून ते बारीक ठेचून पोळीसोबत खायला द्या. खमंग चवीने लगेच खाण्याची इच्छा होईल. 

 

३. मनुका

तव्यावर तूप टाकून मनुका मंद आचेवर थोड्या परतून घ्या. त्यावर काळं मीठ भुरभुरून ते रुग्णांना खायला द्या. तोंडाला चव येईल आणि चयापचय क्रिया, पचन क्रिया सुधारून भूकही चांगली लागेल.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.