Join us   

How to get good deep sleep : बराच वेळ पडून राहिल्यानंतरही झोप येत नाही? वाचा, शांत झोपेसाठी सुंदर पिचई काय करतात?...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 5:00 PM

How to get good deep sleep : दिवसभर धावपळ, दगदग केल्यानंतर रात्री शांत झोप आली नाही पुढचा दिवसही चांगला जात नाही. दिवसभर थकल्यासारखं वाटतं. (Good sleep tips)

दिवसभर शारीरिक आणि मानसिक श्रमानं थकल्यानंतर किमान रात्री तरी आपल्याला शांत झोप मिळावी, असं सगळ्यांनाच वाटतं. पण प्रत्येकाला शांत झोप लागेलच,  असं नाही. (Tips to get better sleep at night) त्यासाठी अनेक जण ध्यानाचा उपयोग करतात. दिवसभर धावपळ, दगदग केल्यानंतर रात्री शांत झोप आली नाही पुढचा दिवसही चांगला जात नाही. दिवसभर थकल्यासारखं वाटतं. (Good sleep tips)

थकलेल्या शरीर - मनाला आराम आणि शांतता मिळण्यासाठी ध्यान करणं, हा अत्यंत उपयुक्त मार्ग असल्याचं आजवर अनेकदा सिद्ध झालं आहे. कालांतरानं ध्यानाचीच विविध तंत्र काही तज्ज्ञांनी विकसित केली. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचईदेखील यासाठी ध्यानाचा एक अफलातून मार्ग वापरतात !...(How to get good deep sleep )  

दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्यानंतर विश्रांतीसाठी सुंदर पिचई आतापर्यंत फारशा परिचित नसलेल्या एका तंत्राचा वापर करतात. त्याचं नाव आहे ‘एनएसडीआर’ म्हणजेच ‘नॉन स्लीप डीप रेस्ट’! स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील न्यूरोसायन्स प्रोफेसर अँड्र्यू ह्युबरमन यांनी यावर संशोधन करताना या शब्दाची निर्मिती केली आहे. 

प्रत्यक्षात थेट न झोपताही आपल्या शरीर - मनाला अतिशय शांतता मिळवून देणारं, रिलॅक्स् करणारं ताण-तणाव घालवणारं हे तंत्र आहे. यूट्यूबवर, इंटरनेटवर ‘एनएसडीआर’ म्हणून सर्च केलं तर तुमच्या शरीर - मनाला शांतता देणारे अनेक ‘पॉडकास्ट’, व्हिडिओ समोर येतील. हे व्हिडिओ पाहणं, ऐकणं आणि त्यानुसार आपलं शरीर रिलॅक्स करणं म्हणजेच हे ‘एनएसडीआर’ तंत्र... खरं तर ध्यानाचाच हा एक वेगळा प्रकार आहे.

सुंदर पिचई म्हणतात, ज्यावेळी मला प्रत्यक्ष ध्यान करायला जमत नाही किंवा कठीण वाटतं, तेव्हा मी या तंत्राचा उपयोग करतो. ‘एनएसडीआर’संदर्भात यू ट्यूबवर दहा मिनिटे, वीस मिनिटे, तीस मिनिटांचे असंख्य व्हिडिओ आहेत. कामाच्या व्यापातून मोकळा झाल्यावर शांतपणे मी हे व्हिडिओ पाहतो, ऐकतो आणि स्वत:ला दिवसभराच्या तणावातून मुक्त करतो.

‘एनएसडीआर’ म्हणजेच ‘नॉन स्लीप डीप रेस्ट’मध्ये तीन मुख्य प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे योगनिद्रा, दुसरा प्रकार आहे हिप्नॉसिस म्हणजे संमोहन आणि तिसरा प्रकार आहे शॉर्ट नॅप म्हणजेच छोटीशी डुलकी... अर्थातच हा प्रकार नवा नाही. निदान ऐकून तरी तुम्हाला तो माहीत असेल.  आता जाणीवपूर्वक या तंत्राचा आपणही वापर करुन पाहा. बघा, तुम्हालाही शांत झोप आणि विश्रांती मिळते की नाही?...  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यसुंदर पिचई