Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to Get Relief from Bloating :  उन्हामुळे नीट भूकही लागत नाही, कमी खाल्लं तरी पोट फुगतं? ५ उपाय,  पोटाचे त्रास कायमचे राहतील लांब

How to Get Relief from Bloating :  उन्हामुळे नीट भूकही लागत नाही, कमी खाल्लं तरी पोट फुगतं? ५ उपाय,  पोटाचे त्रास कायमचे राहतील लांब

How to Get Relief from Bloating : काही पदार्थांमुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते. ज्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 11:38 AM2022-04-03T11:38:57+5:302022-04-03T11:56:59+5:30

How to Get Relief from Bloating : काही पदार्थांमुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते. ज्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. 

How to Get Relief from Bloating : Food to avoid during bloating problem broccoli apple garlic beans for instant relief | How to Get Relief from Bloating :  उन्हामुळे नीट भूकही लागत नाही, कमी खाल्लं तरी पोट फुगतं? ५ उपाय,  पोटाचे त्रास कायमचे राहतील लांब

How to Get Relief from Bloating :  उन्हामुळे नीट भूकही लागत नाही, कमी खाल्लं तरी पोट फुगतं? ५ उपाय,  पोटाचे त्रास कायमचे राहतील लांब

सध्याच्या काळातील चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इतकंच नाही तर जरा खाण्यापिण्यात बदल  झाला तर गॅस, एसिडीटी जाणवते.(Health Tips) जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोट फुगण्याची समस्या असते तेव्हा गॅस तयार होणे, पोट दुखणे, अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे दिसतात. (How to Get Relief from Bloating) अशा वेळी  थोडी काळजी घेतली तर या समस्येवर लवकर मात करता येते. काही पदार्थांमुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते. ज्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. (Food to avoid during bloating problem broccoli apple garlic beans for instant relief)

1) ब्रोकोली

जर तुम्हाला फुगण्याची समस्या असेल तर ब्रोकोलीचे सेवन करू नका. पोटाला ब्रोकोली पचण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते.

२) सफरचंद

जर एखाद्याला फुगण्याची समस्या असेल तर सफरचंदाचा आहारात समावेश करू नका. कारण सफरचंद हे फायबरचा समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे केवळ गॅसची समस्याच उद्भवत नाही तर फुगण्याची समस्या आणि वेदना देखील होऊ शकतात.

३) लसूण

लसूण फुगण्याची  समस्या वाढवू शकतो. यामध्ये फ्रॅक्टेन आढळतो, ज्यामुळे ब्लॉटिंगची समस्या आणखी वाढू शकते.

४) बीन्स

बीन्सच्या सेवनाने फुगण्याची समस्या वाढू शकते. अशा स्थितीत फुगण्याची समस्या असली तरीही व्यक्तीने याचे सेवन करू नये. बीन्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे केवळ डायरियाची समस्याच उद्भवत नाही तर पोट फुगणे आणि पोटदुखीच्या समस्येचा सामना  करावा लागतो.
 

Web Title: How to Get Relief from Bloating : Food to avoid during bloating problem broccoli apple garlic beans for instant relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.