Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करणारे २ सोपे आयुर्वेदिक उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल 

कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करणारे २ सोपे आयुर्वेदिक उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल 

How To Get Relief From Constipation: कॉन्स्टिपेशनचा त्रास नेहमीच होत असेल तर हे २ सोपे उपाय करून पाहा. हा त्रास नेहमीसाठीच कमी होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 12:07 PM2024-02-20T12:07:52+5:302024-02-20T12:08:46+5:30

How To Get Relief From Constipation: कॉन्स्टिपेशनचा त्रास नेहमीच होत असेल तर हे २ सोपे उपाय करून पाहा. हा त्रास नेहमीसाठीच कमी होईल.

How to get relief from constipation? Ayurvedic remedies to reduce constipation, Use of pudina and olive oil for reducing constipation | कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करणारे २ सोपे आयुर्वेदिक उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल 

कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करणारे २ सोपे आयुर्वेदिक उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल 

Highlightsआपण नेहमी करतो तो साधा चहा हे देखील काही लोकांसाठी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणारं उत्तम पेय ठरू शकतं.

कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास अनेक लोकांना असतो. आपल्या खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. एखाद्या व्यक्तीला आहारातला एखादा घटक अजिबातच सहन होत नाही. त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. किंवा नेहमीच कोरडं खाण्याची सवय असेल तरीही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो (How to get relief from constipation?). हा त्रास कमी करण्यासाठी कोणते २ आयुर्वेदिक उपाय करता येतील, ते आता पाहूया.(Ayurvedic remedies to reduce constipation)

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

 

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी कोणते २ उपाय करावेत याची माहिती chitchatrajlavi
and rajeshwarisachdev या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

यामध्ये सांगितलेला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पुदिन्याचा काढा. पुदिन्याचा काढा किंवा चहा करा आणि नााश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यांच्यानंतर तो गरमगरम काढा प्या. हा काढा करण्यासाठी पुदिन्याची पानं पाण्यात घालून ७ ते ८ मिनिटे उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि हवं तर त्यात गूळ टाकून गरमागरम प्या.

मांड्या खूपच जाडजूड दिसतात- हिप्स फॅट पण वाढले? शिल्पा शेट्टी सांगतेय १ सोपा व्यायाम 

यानंतर डॉक्टरांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑईल. दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल टाकून प्या. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी उत्तम लुब्रिकंट म्हणून ऑलिव्ह ऑईल ओळखलं जातं. 

 

हे देखील लक्षात घ्या...

आपण नेहमी करतो तो साधा चहा हे देखील काही लोकांसाठी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणारं उत्तम पेय ठरू शकतं.

कांद्याच्या रसामध्ये टाका फक्त ३ पदार्थ, केसांचं गळणं थांबून झटपट वाढतील- दाट होतील

याशिवाय टॉयलेटमध्ये गेल्यावर वर्तमानपत्र, पुस्तके वाचणे, मोबाईलवर गेम खेळणे किंवा मोबाईल पाहात बसणे या कारणांमुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकताे. त्यामुळे या सगळ्या टॉयलेटमध्ये करणे टाळा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. 

 

Web Title: How to get relief from constipation? Ayurvedic remedies to reduce constipation, Use of pudina and olive oil for reducing constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.