Join us   

How to Get Relief From Gas Problem : सतत गॅस एसिडीटी, पोट फुगल्यासारखं वाटतं? फक्त १ उपाय करा, 2 मिनिटात अपचन होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 4:33 PM

How to Get Relief From Gas Problem : आजकाल बहुतेक लोकांना पोट फुगणे, सतत पोट भरल्यासारखे वाटणे, गॅस, ऍसिडिटी आणि अपचन इत्यादी पोटाशी संबंधित विकार होतात.

उन्हाळा सुरू झाला असून, या ऋतूत पोटाच्या समस्या जास्त असतात. उष्णता वाढली की पचनाच्या समस्या वाढतात असे दिसून येते. तापमानात वाढ झाल्याचा सर्वात जास्त परिणाम पचनसंस्थेवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना पोट फुगणे, सतत पोट भरल्यासारखे वाटणे, गॅस, ऍसिडिटी आणि अपचन इत्यादी पोटाशी संबंधित विकार होतात.  (Natural remedy to relieve gas) अशा समस्या सामान्य वाटतात परंतु त्यांची काळजी न घेतल्यास बद्धकोष्ठता, IBS, ओटीपोटात जळजळ, अतिसार, उलट्या आणि पोट फुगणे यांसारख्या लक्षणांना सामोरे जावे लागू शकते.  (Ayurveda doctor share Home remedy to get rid bloating gas acidity and discomfort in abdomen durin summer)

जर आजकाल तुम्हाला खाल्ल्यानंतर जडपणा जाणवत असेल किंवा पोट फुगणे आणि आम्लपित्त यांसारखी लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक घरगुती उपाय करून पाहू शकता. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, वाढत्या उष्णतेमुळे रोगप्रतिकारशक्ती आणि पचनावर परिणाम होतो, त्यामुळे हे विकार होतात. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे (How do you get instant relief from gas?)

ही कृती तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी घ्या, त्यात 5-7 पुदिन्याची पाने, 1 टीस्पून जिरे आणि 1/2 टीस्पून ओवा घाला. मध्यम आचेवर ३ मिनिटे उकळा, गरम झाल्यावर गाळून प्या. तुम्ही हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या अर्धा तास आधी/नंतर घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला फुगलेले/जड वाटत असेल तेव्हा ते प्या.

 २ मिनिटात स्वच्छ होतील तेलाचे हट्टी डाग; ६ टिप्स वापरा, किचन होईल स्वच्छ, चकचकीत

उन्हाळ्यात पोटासाठी पुदिना सर्वोत्तम आहे. हे केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये सर्दी-खोकला, आम्लपित्त, गॅस, सूज येणे, अपचन, डिटॉक्स, मुरुम, सायनोसायटिस, बद्धकोष्ठता इत्यादींशी लढण्याची क्षमता आहे.

रात्री शांत झोपच येत नाही, बराचवेळ पडून राहावं लागतं? कमी झोपेमुळे उद्भवू शकतात १० समस्या

जिरे हा फक्त मसाला नाही. त्याचा अद्भुत वास आणि चवी व्यतिरिक्त, त्याचे असंख्य आरोग्यादायी फायदे आहेत.  त्यामुळे कफ आणि वात कमी होतो.जळजळ कमी  करण्यासाठी ओवा हा उत्तम मसाला आहे. हे पचायला अतिशय सोपे  आहे आणि जिऱ्याप्रमाणेच कफ आणि वात कमी करते. तुम्ही रोजच्या तुमच्या जेवणात त्याचा समावेश करा. हे  पदार्थ गॅस आणि ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य