सांधेदुखीच्या वेदना (Joints Pain) उद्भवणं खूपच कॉमन आहे. वाढत्या वयात लोकांना हा त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवतो. आजकाल कमी वयाच्या लोकांनाही सांधेदुखीच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. जेव्हा हिवाळा येतो तेव्हा हात, पाय, कंबर आणि सांध्यांच्या समस्या उद्भवतात (How To Get Relief From Knee Pain).
अनेकदा लोक पेन किलरर्स घेतात पुढे यामुळे नुकसानही होऊ शकतं. घरगुती तेल बनवून तुम्ही या तेलानं गुडघ्यांची मसाज करू शकता. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या सर्टिफाईड डायटिशियन आणि न्युट्रिशनिस्ट आहेत. सांध्याच्या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही या तेलानं मालिश करू शकता. (Mustard Oil For Knee Pain)
एसपी पेन सोल्यूशनच्या रिपोर्टनुसार मोहोरीच्या तेलानं नसांमध्ये रक्त प्रवाह उत्तेजित होतो. स्नायू आणि सांध्यातील वेदना कमी होतात. गुडघेदुखीच्या उपचारांसाठी तुम्ही खाली दिलेल्या पद्धतींचा वापर करू शकता. मोहोरीच्या तेलात चिरलेला एक लसूण घ्या आणि त्यात लवंग घाला. तळ हातावर थोडं तेल घेऊन गुडघ्यांवर मालिश करा. हे दररोज शक्य तितक्या वेळा करा.
गुडघेदुखीच्या उपचारासाठी तुम्ही खालील पद्धतीचा वापर करून मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीच्या तेलात चिरलेला लसूण, एक लवंग घाला. आपल्या तळहातावर थोडं मोहरीचे तेल लावा आणि दुखापत झालेल्या भागावर मालिश करा. सर्वोत्तम परिणामांसाठी, हे दररोज शक्य तितक्या वेळा करा.
पोटाचे टायर्स सुटले-मांड्या जाड्या दिसतात? १ चमचा जवस 'या' पद्धतीनं खा; झरझर घटेल चरबी
मोहोरीचं तेल गुडघेदुखीवर रामबाण उपाय
गुडघेदुखीच्या त्रासावर हा परिणामकारक उपाय आहे. मोहोरीच्या तेलातील गुण वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरतात. एका वाटीत थोडं मोहोरीचं तेल घ्या. त्यात लसणाच्या कळ्या घाला. लसूण आणि मोहोरीचं तेल एकत्र गरम करून घ्या. लसूण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून गुडघ्यांवर लावून मसाज करा. या तेलामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
पोट सुटलंय, पण जिभेवर ताबाच नाही? ७ दिवसांचा सोपा डाएट प्लॅन; भराभर वजन कमी होईल
हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता
गुडघ्यांच्या वेदनेवर आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. एंटी इंफ्लेमेटरी गुणांनी परीपूर्ण आल्याचा वापर तुम्ही करू शकता. आलं पाण्यात उकळवून या पाण्याचे सेवन केल्यानं गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो. हळदीचा लेप बनवून तुम्ही गुडघ्यांना लावू शकता.
हळदीचं दूध प्यायल्यानं गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो. हळदी पाण्यासोबत मिसळून किंवा मोहोरीच्या तेलासोबत मिसळून गुडघ्यांवर तुम्ही लावू शकता. हळदीतील एंटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे वेदनांपासून आराम मिळतो. नारळाच्या तेलानंही गुडघ्यांच्या वेदना कमी होण्यास मदत होते.