Join us   

सतत ॲसिडिटी, छातीत जळजळ होते? तज्ज्ञ सांगतात, ॲसिडीटीचा त्रास कायमचा कमी करायचा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 11:41 AM

How To Get Rid From Acidity Reflex : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठीचे काही महत्त्वाचे उपाय आपल्याशी शेअर करतात.

ठळक मुद्दे सारखी अॅसिडीटी होत असेल तर ती कमी होण्यासाठी सोपा उपाय...जीवनशैलीत काही सोपे बदल केल्यास आरोग्याच्या समस्या कमी होण्याची शक्यता असते

अॅसिडीटी ही अनेकांना सातत्याने उद्भवणारी समस्या आहे. हे एकप्रकारचे लक्षण असून शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढल्याने अनेकांना या त्रासाचा सामना करावा लागतो. ही अॅसिडीटी होण्यामागे जागरण, अॅसिडीक पदार्थ खाणे, अल्कोहोलचे सेवन, डीहायड्रेशन, ताण यांसारखी कारणे असतात. अॅसिडीटी झाली की जळजळ होणे, मळमळणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. अनेकांना सतत अॅसिडीटी होते आणि खूप त्रास होतो. मात्र अॅसिडीटी होऊ नये आणि ती मूळापासून दूर राहावी यासाठी काही गोष्टी नियमित केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठीचे काही महत्त्वाचे उपाय आपल्याशी शेअर करतात. हे उपाय कोणते ते पाहूया (How To Get Rid From Acidity Reflex)...

आहारात आवर्जून घ्या हे पदार्थ...

जेवणानंतर गूळ खाणे हा अॅसिडीटी कमी होण्याचा अतिशय चांगला उपाय आहे. तसेच नियमित गाईचे गार दूध, बदाम दूध, ताक, नारळाचे पाणी पिणे यामुळेही अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते. याबरोबरच तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर केळी, सफरचंद ही फळे आवर्जून खायला हवीत. 

(Image : Google)

अॅसिडीटी कमी होण्यासाठी खास पेय

धणे आणि बार्लीच्या बिया रात्रत्रर पाण्यात भिजत घाला. त्यानंतर काकडी, आलं धुवून चिरुन घ्या. त्यात लिंबाचा रस आणि पुदीन्याची पाने घालून धणे आणि बार्लीचे पाणी गाळून घाला. हे सगळे मिक्सर करुन याचा ज्यूस तयार करा. सकाळी उठल्यावर हा ज्यूस घेतल्यास अॅसिडीटीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होते. 

 

या सवयी लावून घ्या..

जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या १ तास नंतर पाणी पिणे, रात्री झोपताना कोमट पाणी पिणे आवश्याक आहे. तसेच जेवणाच्या वेळा सांभाळणेही अतिशय आवश्यक असते. सतत अॅसिडीटी होत असेल तर जंक फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळायला हवेत. जेवणानंतर खाल्लेले अन्न पचण्यासाठी काही वेळ चालायला हवे. जेवल्या जेवल्या लगेच झोपल्यानेही अन्नपचन न झाल्याने अॅसिडीटी होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल