Join us   

सतत मोबाइल चेक करता, स्क्रोल करत वेळ वाया जातो? ४ सोपे उपाय, मोबाइलचं व्यसन सुटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 11:26 AM

How To Get Rid From Phone Addictions : मोबाइलचं व्यसन आपल्याला नाही असं म्हंटलं तरी ते हल्ली अनेकांना आहेच.

ठळक मुद्दे बरेचदा आपण वेगवेगळ्या अॅप्सचे नोटीफिकेशन्सही बंद करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.दिवसातला ठराविक वेळ काहीच न करता बसा.

मोबाइल हा जगभरात सगळ्यांसाठी एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. सकाळी उठल्यापासून एकही काम मोबाइलशिवाय होत नाही. मोबाइल नव्हता तोपर्यंत आयुष्य खूप चांगलं होतं असं मागच्या पिढीतले लोक म्हणतात. सुरुवातीला केवळ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाइलने आपले आयुष्यच व्यापून टाकले आहे. सोशल मीडियाचा अतिवापर सुरू झाल्याने काही लोक सतत मोबाइलला चिकटलेले दिसतात. कधी आपण व्हॉटसअॅप चेक करतो तर कधी युट्यूबवर नाहीतर इन्स्टाग्रामवर काहीना काही सर्फींग करत बसतो. इतकंच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मसही असतातच. काही वेळ फोन चेक केला नाही तर अनेकांना चुकल्या चुकल्यासारखे होते (How To Get Rid From Phone Addictions). 

मोबाइलवर आपले किती तास खर्च होतात हेही आपल्याला अनेकदा समजत नाही. मोबाइल हे एकप्रकारचे व्यसन असून त्यामुळे आरोग्याच्या आणि मानसिक बऱ्याच तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच मोबाइलपासून लांब राहण्यासाठी काय करावे याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध समुपदेशक गरिमा यांनी आपल्या सोल सारथी या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी मोबाइलपासून दूर राहण्यासाठीचे उपाय सुचवले आहेत. 

(Image : Google)

१. आपल्याला मोबाइलचे व्यसन लागले आहे हे अनेकदा आपल्या लक्षात आलेले असते. पण त्यातून बाहेर कसे पडायचे हे मात्र आपल्याला समजत नाही. बरेचदा आपण वेगवेगळ्या अॅप्सचे नोटीफिकेशन्सही बंद करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.

२. अशावेळी फोन कमी वापरायचा म्हणून आपण तो बाजूला ठेवतो खरा. पण फोनशिवाय आपण दूर का राहू शकत नाही याचं कारण मात्र आपण शोधून काढत नाही. त्यामुळे आपण कोणत्या वेळेला फोन जास्त प्रमाणात पाहतो याकडे लक्ष द्या. 

३. स्वत:ला कोणत्या गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही फोन वापरता, तुम्ही खूप दमलेले असता तेव्हा फोन वापरता. की तुम्ही जेव्हा खूप एकटं फिल करता तेव्हा तुम्ही नकळत फोन हातात घेता. याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे.

४. सतत फोन हातात घेण्यामागे नेमके काय कारण आहे हे मूळात जाऊन तपासा आणि त्यानुसार ही सवय कमी करण्यासाठी प्रयत्न करा. दिवसातला ठराविक वेळ काहीच न करता बसा. त्याशिवाय योगा, प्राणायम या गोष्टी आवर्जून करा.

टॅग्स : आरोग्यमोबाइल