Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त

घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त

How To Get Rid from Throat Irritation : हवाबदलाचा सामना करण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा सोप्या घरगुती उपायानी त्यावर मात करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 09:02 AM2022-06-23T09:02:56+5:302022-06-23T09:05:01+5:30

How To Get Rid from Throat Irritation : हवाबदलाचा सामना करण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा सोप्या घरगुती उपायानी त्यावर मात करा...

How To Get Rid from Throat Irritation : Sore Throat, 5 Home Remedies, Avoid Rainy Sore Throat; Stay fit in the rain | घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त

घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त

Highlightsरात्री झोपताना गरम दूध आणि हळद घेतल्यास घशाचा त्रास कमी होण्यास त्याची चांगली मदत होते. घशाला खवखवत असेल तर लगेच औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले केव्हाही चांगले

अंगाची लाहीलाही करणारा उकाडा गेल्या काही दिवसांपासून कमी झाला आहे. पावसाळी वातावरण पडले असले तरी हवाबदल झाला की आपले शरीर काही ना काही परिणाम दाखवायला सुरुवात करते. कधी खोकला होतो, तर कधी सर्दी आणि ताप, कधी घास खवखवतो. हवाबदलाचा सामना करायचा तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. मात्र तरीही हवाबदलामुळे आपल्याला काही त्रास झालाच तर लगेच डॉक्टरांकडे न पळता काही घरगुती उपचारांनी आपल्याला आराम मिळू शकतो. त्यासाठी घरच्या घरी करता येतील असे उपाय आपल्याला माहित असायला हवेत. सध्या हवेत सतत बदल होत असल्याने तुम्हाला घसा खवखवण्याचा त्रास होत असेल तर खाली दिलेले उपाय नक्की करुन पाहा (How To Get Rid from Throat Irritation). 

(Image : Google)
(Image : Google)

१. कोमट पाणी प्या 


आपल्याला कोणतेही इन्फेक्शन होणार असेल तर सगळ्यात आधी आपल्या घशावर त्याचा परिणाम होतो. गरम पाण्यामुळे घशात असणारे विषाणू नष्ट होण्यास मदत होते. तसेच खवखवणाऱ्या घशाला आराम मिळण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते. यामध्ये चिमूटभर हळद घातल्यास इन्फेक्शन बरे होण्यास मदत होते.

२. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या

घशातले इन्फेक्शन दूर होण्यासाठी याठिकाणी असलेला व्हायरल निघून जाणे आवश्यक असते. एकदा हा व्हायरल शरीराच्या इतर भागात पसरला की तो लवकर बरा होत नाही. त्यामुळे घशात असतानाच या व्हायरसचा नाश करणे आवश्यक असते. गुळण्या केल्याने घशाला आराम मिळू शकतो, तसेच घशाची सूज कमी होण्यास, खवखव कमी होण्यास याची चांगली मदत होते. 

३. मध हळदीची गोळी 

मध आणि हळद दोन्हीमध्ये अँटीबायोटीक गुणधर्म असल्याने घशाला त्रास होत असेल तर हळद आणि मध एकत्र करुन त्याची गोळी करावी आणि दिवसातून दोन ते तीन वेळा ही गोळी खायची. यामुळे घशातील विषाणू नष्ट होण्यास मदत होते आणि लवकर आराम मिळतो. 

४. आलं 

पावसाळ्याच्या दिवसांत हवेत थंडावा असल्याने आपण आवर्जून आल्याचा चहा घेतो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे घसा खवखवत असताना आल्याचा चहा, आल्याचे कोमट पाणी, आलेपाक या गोष्टी आवर्जून खायला हव्यात. त्यामुळे घशाची खवखव लवकर बरी होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

५. दूध हळद

हळदीमध्ये अँटीसेप्टीक आणि अँटीबायोटीक घटक असतात. त्यामुळे घशात असलेल्या विषाणूंचा नाश होण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. गरम दुधाने घशाला आराम मिळतो आणि अशक्तपणा आला असल्यास शरीराला ताकद मिळण्यास मदत होते. त्यामुळे रात्री झोपताना गरम दूध आणि हळद घेतल्यास घशाचा त्रास कमी होण्यास त्याची चांगली मदत होते. 
 

Web Title: How To Get Rid from Throat Irritation : Sore Throat, 5 Home Remedies, Avoid Rainy Sore Throat; Stay fit in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.