Blocked Nose : हिवाळ्यात सर्दीमुळे नाक बंद होणं ही एक कॉमन समस्या आहे. एकदा का सर्दीमुळे नाक बंद झालं तर काही सुचत नाही. नाक बंद झालं तर श्वास घेण्यासही समस्या होते. रात्री चांगली झोप येत नाही आणि अनेकदा तर नाक बंद असल्यानं डोकंही दुखतं. तुम्हालाही नेहमीच नाक बंद होण्याची समस्या होत असेल तर एक्सपर्टनं एक आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यानी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, हा उपाय त्यांची आजी करायची. ज्याद्वारे बंद झालेलं नाक लगेच मोकळं होत होतं. तुम्हीही हा उपाय करू शकता.
बंद नाक मोकळं करण्याचा आयुर्वेदिक उपाय
हा आयुर्वेदिक उपाय केल्यावर नाक तर मोकळं होईलच, सोबतच सर्दी-पडसाही बरा होईल. तसेच स्ट्रेसही कमी होईल. हा उपाय करण्यासाठी सुती कापडाचा एक तुकडा घ्या. त्यात १० ते १२ कापूर, १ ते २ चमचे भाजलेला ओवा, ६ ते ७ मेंथॉलचे तुकडे आणि ५ ते ६ थेंब नीलगिरी तेल टाका. या गोष्टी कापडामध्ये गुंडाळून बांधून घ्या. दिवसभर याचा सुंगध घेत रहा. बंद नाक मोकळं होईल आणि तुम्हाला फ्रेशही वाटेल.
इतर काही टिप्स
- बंद झालेलं नाक मोकळं करण्यासाठी वाफही घेऊ शकता. वाफ घेतल्यानं नाक साफ होतं.
- गरम पाण्यानं आंघोळ केल्यानंही बंद नाक मोकळं होण्यास मदत मिळते.
- दिवसभर पाणी पित रहा. शरीराला हायड्रेशन मिळालं तर नाकात जमा म्यूकस पातळ होऊन बाहेर पडतो. तुम्ही हर्बल टी आणि सूपही पिऊ शकता.
- तिखट भाजी किंवा पदार्थ खाल्ल्यावरही बंद नाक मोकळं होतं. तिखट खाल्ल्यावर नाकातून पाणी येतं, ज्यामुळे बंद नाक मोकळं होण्यास मदत मिळेत.