Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to Get Rid of Bad Smells In Your House : पावसाळ्यात घरात कुबट वास येऊ नये म्हणून ३ उपाय करा; घर नेहमी राहील फ्रेश, स्वच्छ 

How to Get Rid of Bad Smells In Your House : पावसाळ्यात घरात कुबट वास येऊ नये म्हणून ३ उपाय करा; घर नेहमी राहील फ्रेश, स्वच्छ 

How to Get Rid of Bad Smells In Your House : घरात आणि कपड्यांमध्ये येणारा हा कुबट वास घरातलं संपूर्ण वातावरण खराब करू शकतो. अशाच घरात कोणीही पाहूणे आले तर अवघडल्यासारखं वाटू शकतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 10:19 PM2022-06-04T22:19:03+5:302022-06-04T22:40:15+5:30

How to Get Rid of Bad Smells In Your House : घरात आणि कपड्यांमध्ये येणारा हा कुबट वास घरातलं संपूर्ण वातावरण खराब करू शकतो. अशाच घरात कोणीही पाहूणे आले तर अवघडल्यासारखं वाटू शकतं. 

How to Get Rid of Bad Smells In Your House : How to get rid of stink smell from your home and clothes post rains | How to Get Rid of Bad Smells In Your House : पावसाळ्यात घरात कुबट वास येऊ नये म्हणून ३ उपाय करा; घर नेहमी राहील फ्रेश, स्वच्छ 

How to Get Rid of Bad Smells In Your House : पावसाळ्यात घरात कुबट वास येऊ नये म्हणून ३ उपाय करा; घर नेहमी राहील फ्रेश, स्वच्छ 

(Image Credit- Pvhvac.Com)

उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून आपण सर्वजण पावसाळ्याची वाट पाहत असतो की पाऊस कधी येईल, जेणेकरून वातावरण आल्हाददायक होईल, परंतु सततच्या पावसामुळे घरात ओलावा आणि ओलसरपणा निर्माण होतो. याशिवाय आपले कपडे घराब होतात. (Home Hacks & tips) कपडे कितीही नीट धुतले तरी ऋतूतील हवेतील ओलावा आणि ओलसरपणामुळे कपडे आणि घर दोघांनाही दुर्गंधी येऊ लागते. (How to get rid of stink smell from your home and clothes post rains)

घरात आणि कपड्यांमध्ये येणारा हा कुबट वास घरातलं संपूर्ण वातावरण खराब करू शकतो. अशाच घरात कोणीही पाहूणे आले तर अवघडल्यासारखं वाटू शकतं. आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरातील दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. (How to Get Rid of Bad Smells In Your House)

पावसाळ्यात कपडे धुतल्यानंतर एकदा कापूराच्या पाण्यात बुडवून बाहेर काढा. त्यानंतर ते कोरडे करण्यासाठी ठेवा. ते सुकल्यावर कपाटात ठेवा, कपाटात ओलसरपणा नसेल याची काळजी घ्या, जर असेल तर प्रथम  कापटातील खालचे कागद बदला, कोरड्या कपड्यांनी पूर्णपणे स्वच्छ करा, नंतर कपडे ठेवा. कपाटात कपडे पेपरात ठेवताना, गुंडाळून ठेवता येतात. (Home Cleaning Hacks)

पावसाळ्यात  घराच्या तळघर किंवा बाथरूममध्ये, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी बर्‍याचदा दुर्गंधी येते. या वासापासून मुक्त होण्यासाठी पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून घराच्या ज्या भागात दुर्गंधी आहे त्या ठिकाणी स्प्रे करा. (Cleaning Tips and Tricks)

किचनमधली झुरळं, चिलटं ५ मिनिटात होतील दूर; पुदिन्याचा करा वापर

तुम्ही तुमच्या कपाटात नेहमी काही नॅप्थालीन गोळ्या ठेवाव्यात. ते वास दूर करते आणि एक चांगला वास देखील देते.पावसाळ्यात ओलसर हवेमुळे आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे बहुतेक कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते. यासाठी कॉफी कपात ठेवा आणि घराच्या तळघरात किंवा बाथरूममधील कपाटात ठेवा, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. यामुळे कपड्यांमधला वास लवकर निघून जाईल.

रोजच्या जेवणात ३ पदार्थांचा समावेश करा; वाढणार नाही ब्लड शुगर, CDC चा दावा

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रणही घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. याशिवाय फक्त व्हिनेगर स्प्रे बाटलीत भरून नैसर्गिक रूम फ्रेशनर म्हणून वापरता येते. बाजारात विकले जाणारे आर्टिफिशियल रूम फ्रेशनर वापरत असाल तर एकदा कापूर वापरून पहा. यामुळे घरात ताजेपणा येतो आणि वास दूर होतो. खोलीतील मोकळ्या जागेत दिव्यात कापूर लावावा. काही वेळातच त्याचा सुगंध घरभर पसरेल.

पाण्यात लेमन ग्रास आणि लॅव्हेंडर ऑइल मिसळा आणि रूम फ्रेशनर म्हणून वापरा, घरभर फवारणी करा. कपडे धुताना तुम्ही पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाकू शकता. यामुळे कपड्यांमधून येणारा वासही दूर होईल. कपडे प्लॅस्टिक बॅग किंवा पेपरमध्ये दुमडून कपाटात ठेवल्यास ते कपाटाच्या थेट संपर्कात येणार नाहीत आणि खराबही होणार नाहीत.

Web Title: How to Get Rid of Bad Smells In Your House : How to get rid of stink smell from your home and clothes post rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.