Join us

उठता- बसता हाडं कुरकुरतात, कट- कट आवाज येतो? 'हा' पदार्थ खा- म्हातारपणीही हाडं दणकट राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 12:51 IST

How To Get Rid Of Calcium Deficiency?: हाडांचं दुखणं आता कमी वयातच सुरू झालं आहे. त्यामुळेच ते टाळण्यासाठी कॅल्शियम देणारे काही पदार्थ रोजच आपल्या आहारात असायला पाहिजेत..(best food for strong bones)

ठळक मुद्दे पाय दुखतात, गुडघे, पाठ, कंबर दुखते अशी तक्रार करणाऱ्या तरुण मंडळींचं प्रमाण वाढलं आहे.

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडांचं दुखणं मागे लागायचं. उठता- बसता हाडं दुखतात, गुडघे कुरकुरतात किंवा पाठ- कंबर दुखते असं म्हणणारी तरुण व्यक्ती क्वचितच एखादी असायची. पण आता मात्र मागच्या काही वर्षांपासून आपल्या लाईफस्टाईलमध्ये जो काही बदल झाला आहे त्यामुळे कमी वयातच हाडांचं दुखणं खूप जास्त वाढलं आहे. आहार योग्य नसल्याने शरीराला पुरेसं कॅल्शियमही मिळत नाही (how to get rid of calcium deficiency?). शिवाय व्यायामाचा अभाव, शारिरीक हालचाली कमी झाल्या.. त्यामुळेही हाड कमकुवत होत आहेत (best food for strong bones).  त्यामुळेच पाय दुखतात (superfood for calcium), गुडघे, पाठ, कंबर दुखते अशी तक्रार करणाऱ्या तरुण मंडळींचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी एक खास पदार्थ आपण खायलाच पाहिजे असं तज्ज्ञ सुचवत आहेत.(calcium rich superfood)

 

हाडं मजबूत करण्यासाठी कोणता पदार्थ खावा?

हाडांना मजबूत, दणकट करण्यासाठी कोणता पदार्थ नियमितपणे खायला हवा, याविषयी माहिती देणारा व्हिडीओ drirfan94 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

यामध्ये तज्ज्ञ सांगत आहेत की शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण वाढवून हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी पांढरे तीळ नियमितपणे खायला हवेत. कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. अगदी ५ वर्षांच्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच तीळ चालतात.

 

त्यामुळे घरातल्या सगळ्याच सदस्यांनी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी नियमितपणे तीळ खाणं गरजेचं आहे.

आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

यासाठी तीळ निवडून घ्यावेत आणि कढईमध्ये थोडे भाजून घ्यावे. यानंतर ते थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर तयार करून घ्यावी. दररोज सकाळी किंवा रात्री दुधासोबत ही पावडर घ्यावी. हा उपाय नियमितपणे केला तर कॅल्शियमसाठी कधीच कोणता औषधांचा डोस घेण्याची गरज पडणार नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न