Join us

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने सांगतात बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय- पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 18:53 IST

How To Get Rid Of Constipation: बद्धकोष्ठतेचा त्रास नेहमीच होत असेल तर त्यासाठी काय उपाय करावे, याविषयीची माहिती अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Dr. Shriram Nene explains causes and reasons for constipation)

ठळक मुद्दे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत?

हल्ली बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टीपेशनचा त्रास खूप जणांना होतो. पोट गच्च होते. सकाळी पोट साफ होण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करावा लागतो. असा त्रास कधीतरीच होत असेल तर ते समजण्यासारखं आहे. पण काही जणांना मात्र नेहमीच असा त्रास होतो. यासाठी त्यांची बदललेली जीवनशैली आणि काही सवयी खूप कारणीभूत आहे. त्या सवयी नेमक्या कोणत्या आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत (How To Get Rid Of Constipation?), याविषयीची माहिती डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Dr. Shriram Nene explains causes and reasons for constipation)

 

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितलेले उपाय

१. डॉ. श्रीराम नेने सांगतात की आहारात कमी प्रमाणात फायबर घेत असाल तर त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यासाठी फायबरयुक्त पदार्थ आहारात जास्तीतजास्त असू द्या. त्याशिवाय हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी धान्येही तुमच्या आहारात असायला हवी. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

उन्हामुळे रोपं सुकून पानं जळू लागली? ५ गोष्टी तातडीने करा- रोप पुन्हा हिरवेगार होईल

२. पाणी खूप कमी प्रमाणात प्यायल्यानेही पचनक्रिया, चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर नेहमीच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर काही दिवस नेहमीपेक्षा थोडे जास्त पाणी प्या. पोट साफ होण्यास मदत होईल. 

 

३. काही जण टॉयलेटला जाण्याचा कंटाळा करतात. कंटाळा आला किंवा वेळ नाही म्हणून नैसर्गिक विधी टाळून पुढे ढकलले जातात. ही सवयही बद्धकोष्ठतेचा त्रास वाढविणारी आहे असं डॉ. नेने सांगतात.

उन्हाळ्यात डिहायड्रेशन होतं आहे हे सांगणारी ५ लक्षणं, चक्कर येऊन पडाल-जीवावर बेतेल

४. स्वतःला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह ठेवा. व्यायाम करा. शारीरिक हालचाली वाढवा. यामुळेही तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलमाधुरी दिक्षितपाणीअन्न