Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय? ३ सोपे उपाय करा, न मारता उंदीर काढा घराबाहेर

घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय? ३ सोपे उपाय करा, न मारता उंदीर काढा घराबाहेर

How To Get Rid Of Mice Naturally With Home Remedies (Undir Palvnyache Upay) : घरात शिरलेल्या उंदराना न मारता बाहेर पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 11:19 AM2024-07-24T11:19:34+5:302024-07-24T11:26:03+5:30

How To Get Rid Of Mice Naturally With Home Remedies (Undir Palvnyache Upay) : घरात शिरलेल्या उंदराना न मारता बाहेर पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. 

How To Get Rid Of Mice Naturally With Home Remedies According to Research | घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय? ३ सोपे उपाय करा, न मारता उंदीर काढा घराबाहेर

घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय? ३ सोपे उपाय करा, न मारता उंदीर काढा घराबाहेर

घरात कितीही साफ-सफाई स्वच्छता ठेवली तरी घरात अनेकदा उंदीर शिरतात पावसाळ्याच्या दिवसांत घरात उंदीर इकडून तिकडे फिरताना दिसले तर खूपच किळस येते. उंदीर घरात  असतील तर अनेक आजार पसरण्याचा धोका असतो. अन्न दुषित होऊन फूड पॉइजनिंगसुद्धा होऊ शकतं. (What Smell Will Keep Mice Away) घरात लहान मुलं असतील तर अधिकच काळजी घ्यावी लागते.  स्वयंपाकघरात सगळ्यात आधी उंदरं शिरतात. घरात शिरलेल्या उंदराना न मारता बाहेर पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया.  (How To Get Rid Of Mice)

स्क्रिप्स रिसर्च इंस्टिट्यूटच्या एका रिपोर्टनुसार घरात मांजर पाळणे हा उंदरांना दूर ठेवण्याचा प्रभावी उपाय आहे.  अभ्यासानुसार मांजरीच्या लघवीतून येणाऱ्या वासाने उंदरांना भिती वाटते. उंदरांना घराबाहेर ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.(Ref) पाळीव प्राण्याचा आहार, त्यांची काळजी घेणं हे खर्चीक असू शकतं पण काही दिवसांसाठी तुम्ही घरात मांजर पाळू शकता. ( How To Get Rid Of Mice Naturally With Home Remedies)

1) लवंग

उंदरांना लवंगाचा वास जराही आवडत नाही. अशा स्थितीत तुम्ही लवंग कुटून किंवा पाण्यात मिसळून उंदरांच्या बिळावर शिंपडू शकता. जर घरात उंदिर जास्त फिरताना दिसून आले तर लवंगाचे पाणी उंदरांवर शिंपडू शकता. 

2) कांदा लसूण

उंदरांना कांदा लसणाचा वास सहन होत नाही. ज्या ठिकाणी उंदिर फिरतात तिथे चिरलेला कांदा किंवा चिरलेले लसूण ठेवा. या वासाने उंदीर घराबाहेर पडतील.  उंदरांना स्वंयपाकघरापासून दूर ठेवण्याचा हा चांगला उपाय आहे.

3) पुदिना

पुदिन्याच्या तीव्र वासाने  उंदर घरात राहत नाहीत. पुदिन्याची पानं बारीक करून घराच्या कोपऱ्यात आणि दरवाज्याजवळ ठेवा किंवा पुदिन्याते तेल एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरात शिंपडा. ज्यामुळे उंदरांच्या त्रासापासून आराम मिळेल. 

घरात कुठेही मोठं छिद्र किंवा फट असेल तर ती तपासून वेळीच ब्लॉक करा जेणेकरून उंदीर आत शिरणार नाही.  स्टिल वूलस कौल्क किंवा मेटल फ्लेशिंगन सिल करू शकता. उंदिर जेवणाकडे नेहमी आकर्षिक होत असतात यासाठी घर नेहमीच स्वच्छ ठेवायला हवं. जेवण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. खाली पडलेले अन्नकण त्वरीत साफ करा. उरलेलं जेवण जेवण रात्री न चुकता झाकण ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. 

लहानपणापासून प्रचंड हूशार असतात 'या' ४ सवयी असलेली मुलं; टेंशन घेणं सोडा-स्मार्ट होतील मुलं

घरात आधीपासूनच  उंदिर असतील तर त्यांना पकडण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. स्नॅप ट्रॅप, ग्लु ट्रॅप आणि ह्यूमन लाईव्ह यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. भिंतीसह  इतर भागात उंदिर फिरत असतील तर फर्नीचरच्या मागे स्वंयपाकघर किंवा कपाटात तुम्ही हे ठेवू शकता. उंदरांना पिंजऱ्यात  अडकवण्यासाठी शेंगदाणे,  बटर, चॉकलेट किंवा पनीरचा समावेश करा. ओव्हरलोडेड ठेवू नका. 

Web Title: How To Get Rid Of Mice Naturally With Home Remedies According to Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.