Join us   

संध्याकाळ होताच घर डासांनी भरतं? डास पळवून लावण्याची १ ट्रिक; आसपासही येणार नाहीत डास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 12:38 PM

How to get rid of mosquitoes in house : रसायनयुक्त फवारण्या आणि कॉइल इत्यादी गोष्टींमधून निघणारा धूर हानिकारक असतो. हे सर्व टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही या डासांपासून मुक्ती मिळवू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात डास  चावण्याची समस्या  सर्वांनाच उद्भवते. संध्याकाळच्यावेळी चुकून दारं, खिडक्या उघड्या राहिल्या की डासांनी घर भरतं. रात्री गाढ झोपेत असताना डास चावले तर झोप मोड होते इतकंच नाही तर अंगावर मोठमोठे फोडही येतात. शिवाय डास चावल्यानंतर साथीचे आजार पसरण्याचाही धोका असतो. डास पळवून लावण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.  (How to get rid of mosquitoes at home)

 डास घरात शिरून मलेरिया, डेंग्यू, ताप यांसारखे आजार पसरवण्यापासून थांबत नाहीत.  रसायनयुक्त फवारण्या आणि कॉइल इत्यादी गोष्टींमधून निघणारा धूर हानिकारक असतो. हे सर्व टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून तुम्ही या डासांपासून मुक्ती मिळवू शकता. (Best Hacks and Tips to Getting Rid of Mosquitos at Home)

सगळ्यात आधी विक्स एका वाटीत काढा. त्यात बेकींग पावडर घाला. पाणी घालून हे मिश्रण नीट मिसळून घ्या. हे मिश्रण डास घालवण्यासाठी उपलब्ध असलेल्या बॉटलमध्ये भरा. त्यावर मशीन लावून नेहमीप्रमाणे बटन ऑन  करा. या उपायानं डास दूर पळण्यास मदत होईल. 

तुळस

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. घरात तुळशीचे रोप लावल्याने डास पळतात. त्याचा रस तुम्ही शरीरावर वापरू शकता. यामुळे डासांपासून सुटका होऊ शकते.

लॅव्हेंडर

लॅव्हेंडर केवळ सुगंधित फूल नाही तर ते डासांना दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. त्याच्या सुगंधापासून डास पळून जातात. तुम्ही खोलीत त्याचे तेल फवारू शकता.

झेंडूचे फूल

झेंडूचे फूल फक्त तुमच्या घराची बाल्कनी सुंदर बनवण्याचे काम करत नाही, तर त्याचा सुगंध डास आणि उडणारे कीटक यांनाही तुमच्यापासून दूर ठेवतो.

लसूण आणि पुदीना

डासांना घालवण्यासाठी लसूण हा एक चांगला पर्याय आहे. याच्या  वासाने डास दूर पळतात. याशिवाय पुदिन्याचा रसही वापरू शकता. यापासून डास पळून जातात.

जेवण कमी केल्यानं वजन भराभर घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की....

खोबरेल तेल

खोबरेल तेल सहसा प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते. जर तुम्हालाही डासांचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यात पेपरमिंट तेल, नीलगिरीचे तेल, लवंग तेल, खोबरेल तेल आणि कडुलिंबाचे तेल समान प्रमाणात मिसळावे. यानंतर तेलाचे हे मिश्रण एका बाटलीत साठवा. रात्री झोपताना हे मिश्रण त्वचेवर लावा. असे केल्याने झोपताना डासांचा त्रास होणार नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य