बदलत्या ऋतूनुसार (Winter Season) आपण आजारी पडतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे हिवाळ्यात मुख्य म्हणजे घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप येतो. जेव्हा एखद्याला असे आजार होतात, तेव्हा छातीत कफ जमा होऊ लागते. ज्यामुळे नाक, छाती आणि घशात जमा झालेल्या कफमुळे आपल्याला सतत अस्वस्थ वाटते. शरीरासाठी थोड्या प्रमाणात कफ आवश्यक आहे. कफ (Cough) घशाच्या कोरडेपणापासून संरक्षण करते. परंतु जास्त प्रमाणात तयार झाल्याने ते वेळीच काढायला हवे.
कफ वाढले की बोलण्यात अडचण, श्वास घेण्यास त्रास, झोप न लागणे, छातीत जडपणा यासह इतर समस्या छळतात. जर छातीतील कफ घरच्या उपायांनी काढायचे असतील तर, कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक कपिल त्यागी यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. या उपायांद्वारे कफ काढून टाकून आपण सर्दी, फ्लू आणि घसा खवखवणे यासारख्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता(How to Get Rid of Mucus in Chest).
घरातील हवेमध्ये आर्द्रता राखा
जवळपासच्या हवेत आर्द्रता असल्याकरणामुळे कफ पातळ राहते. ज्यामुळे घशात खवखवण्याच्या त्रासापासून आराम मिळतो. यासाठी आपण कूल मिस्ट ह्युमिडिफायरचा वापर करू शकता. यामुळे आपल्या घरातील हवेमध्ये जास्त थंडावा जाणवत नाही.
हायड्रेटेड राहा
शरीराला नेहमी हायड्रेटेड ठेवा. कारण थंडी वाढताच आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शिवाय वातावरणात गारवा असल्याकारणाने आपण पाणीही कमी प्रमाणात पितो. पण असे न करता लिक्विड पदार्थ, फळे, ज्यूस, सूप पीत राहा. शिवाय गरम पाण्याने आंघोळ आणि उबदार कपडे घाला.
लिंबू-आलं कफ काढण्यास प्रभावी
लिंबू, आलं आणि लसूण कफ काढण्यास मदत करतात. आल्याच्या सेवनामुळे सर्दी आणि खोकला कमी होतो. शिवाय कॅपसायसिनयुक्त पदार्थ जसे की, लाल मिरची कफ काढण्यास मदत करतात. जर आपण सर्दी आणि खोकल्यापासून त्रस्त असाल तर, रोज रात्री दुधात हळद घालून प्या.
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने घसा साफ होतो. बरेच जण हे नियमित करतात. आपण देखील हिवाळ्यात नियमित करू शकता. गुळण्या केल्याने कफ बाहेर पडतोच, शिवाय छातीत जडपणाही वाटत नाही.