Join us   

दातांच्या मधोमध किड लागलीये? १ चमचा नारळाच्या तेलाचा १ उपाय-२ मिनिटांत बाहेर निघेल किड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:27 PM

How To Get Rid Of Teeth Cavity Naturally : दातांना किड लागणं एक मोठी समस्या आहे. पुढे जाऊन हीच गंभीर समस्या बनू शकते.

दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचे आहे. यासाठी आपल्या डेली रुटीनकडे लक्ष द्यायला हवं. (Teeth Care Tips) आजकाल बऱ्याच लोकांना दातांत किड साचल्याची समस्या उद्भवते. दातदुखीच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास दात खराब होण्याचा धोका असतो. (Natural Home Remedies For Tooth Decay) दातांना किड लागणं एक मोठी समस्या आहे. पुढे जाऊन हीच गंभीर समस्या बनू शकते. अनेकदा लोक समस्यांचे सोल्यूशन काढण्यासाठी डेंटिस्टकडे जातात. पण काही प्राकृतिक उपाय करून तुम्ही किडलेल्या दातांची समस्या दूर करू शकता. नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही दातांमधली किड सहज काढून टाकू शकता. (How To Get Rid Of Teeth Cavity Naturally) 

2020  च्या  एका अभ्यासात २० लोकांवर नारळाच्या तेलाचा प्रयोग करण्यात होता. ज्यांच्या दातांत किड साचलेली दिसून आली होती. (Ref) त्यात असं दिसून आलं की नारळाचं तेल प्लाक काढून टाकण्यास मदत होते. २०१७ च्या एका अभ्यासात दिसून आले की ४० डेंटल अभ्यासाच्या विद्यार्थांना ऑईल पुलिंग इफेक्टिव्ह असल्याचं दिसून आलं. ज्यामुळे प्लाक निघून जातात.

दातांमधील किड काढून टाकण्यासाठी नारळाचे तेल कसे फायदेशीर ठरते

नारळाचे तेल एक प्राकृतिक उपाय आहे ज्यामुळे दातांची किड निघून जाण्यास मदत होते. ज्यामुळे दात स्वच्छ राहतात नारळाच्या तेलात प्राकृतिक एंटीबॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे बॅक्टेरियाज मरतात. ज्यामुळे दातांना किड लागत नाही. नारळाच्या तेलाचा दातांवर वापर करण्यासाठी १ चमचा नारळाच्या तेलाच अर्धा ते एक चमचा सोडा मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या.

ज्यामुळे होमोजीनस सोल्यूशन बनेल. नंतर हे मिश्रण दातांवर लावून घ्या.  काही मिनिटं तोंडात ठेवा. ज्यानंतर गरम पाण्याने तोंड स्वच्छ धुवून घ्या. नारळाचे तेल दातांवर लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सगळ्यात आधी डेंटिस्ट्सचा सल्ला घ्या. हा एक नैसर्गिक उपाय आहे. ज्यामुळे दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि दातांची किड निघून जाते. 

ऑईल पुलिंग कसे करावे? (Right Way To Do Oil Pulling)

सगळ्यात आधी तोंडात जवळपास १ टिस्पून तेल घाला. त्यानंतर १५ ते २० मिनिटं तोंडात तेल ठेवा.  हा उपाय करण्यासाठी खूप ताकद लावण्याची गरज नसते. ऑईल पुलिंगमुळे तुमच्या चेहऱ्यांच्या स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर थोडावेळ आराम करा. कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करा. तेल तोंडात जास्त जोरात फिरवू नका. काहीजण अंघोळीनंतर ऑईल पुलिंग करतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य