पांढरे मोत्यासारखे दात प्रत्येकाला हवे असतात (Teeth Cleaning). पण कितीही ब्रशने घासलं तरी, दातांवरचा पिवळेपणा निघत नाही. दातांच्या पिवळेपणामुळे आपण चारचौघात हसणंही टाळतो (Home Remedies). लाजिरवाण्या स्थितीमुळे आपण लोकांसोबत बोलणंही कमी करतो. त्यामुळे डेण्टिस्ट दिवसातून २ वेळा दात घासण्याचा सल्ला देतात. पण बऱ्याचदा दात घासूनही दातांचा पिवळेपणा निघत नाही.
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी सकाळी, रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे, जेवल्यानंतर तोंड चांगले धुणे, गोड पदार्थ जास्त प्रमाणात न खाणे आणि दररोज जीभ स्वच्छ करणे या गोष्टी करायला हवे. याव्यतिरिक्त आपण घरात टुथपेस्ट तयार करू शकता. या घरगुती टुथपेस्टमुळे दात स्वच्छ होतील आणि मोत्यासारखे चमकतील(How to get rid of yellow teeth: 3 home remedies).
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती टिप्स
जामून पावडर
जामुन पावडर किंवा जामुन बियाणे पावडर प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियमयुक्त असतात. याच्या वापराने दातही साफ होतात. यासाठी बाऊलमध्ये वाटीभर जामून पावडर घ्या. त्यात खडे मीठ आणि काळी मिरी मिसळा. या पावडरने दात स्वच्छ होतील.
बदामाच्या साली
बदामाच्या साली दात स्वच्छ करण्यासाठी मदत होऊ शकते. बदाम भिजत घातल्यानंतर आपण साली फेकून देतो. पण याचा वापर आपण दात स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यासाठी बदामाची साल भाजून पावडर तयार करा. त्यात खडे मीठ मिसळा. आणि या पावडरने दात स्वच्छ करा.
बॉयफ्रेंडने फ्राईड फूड ऑर्डर केलं म्हणून मी ब्रेकअप केलं होतं, कारण..रकुल प्रीत सिंग म्हणते..
लिंबू आणि तेल
लिंबाच्या वापराने आपण दात स्वच्छ करू शकता. यासाठी लिंबाच्या रसामध्ये तेल आणि मीठ मिसळा आणि दात स्वच्छ करा. यामुळे दातांचा पिवळेपणा निघून जाईल.