Join us   

दातांवर पिवळा थर-लहानशी कीड दिसतेय? ५ घरगुती उपाय- दातांचं भयानक दुखणं टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 4:16 PM

How to Get Rid of Yellow Teeth: 5 Home Remedies : दाताचं दुखणं त्रासदायक आणि खर्चिकही, वेळीच योग्य उपाय केले तर त्रास वाचेल

दात (Tooth Problems) जर स्वच्छ असतील तर, आरोग्य देखील उत्तम राहते. पण दात जर अस्वच्छ असतील तर, दातांमधील किटाणूमुळे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. दातांमधील कॅव्हिटीमुळे (Cavity) अनेकदा इतर दातांवरही कॅव्हिटी निर्माण होते. दातांमधील कॅव्हिटी, पिवळेपणा, कीड लागणे, यामुळे आपण अनेकदा चारचौघात हसणं देखील टाळतो. यावर उपाय म्हणून आपण डेण्टिस्टचा सल्ला घेतो. जर आपल्याला घरगुती (Home Remedies) उपायांनी दातांची काळजी घ्यायची असेल तर, काही टिप्स आणि ४ पदार्थांचा आहारात समावेश करा.

यासंदर्भात, डेण्टिस्ट सुरीना सहगल यांनी इन्स्टाग्रामवर माहिती शेअर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 'दातांची काळजी घेताना आपण काय खात आहोत. याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. अनेकांना दात न घासता ब्रेकफास्ट करण्याची सवय असते. ही सवय वेळीच मोडा. कारण सकाळी दात अॅसिडिक स्टेजमध्ये असतात. त्यामुळे दातांचे आरोग्य बिघडू शकते'(How to Get Rid of Yellow Teeth: 5 Home Remedies).

दातांमधील कॅव्हिटी, पिवळेपणा काढण्यासाठी ४ पदार्थ

स्ट्रॉबेरी

व्हिटॅमिन सीने समृद्ध स्ट्रॉबेरीज केवळ आरोग्यासाठी नसून, दातांसाठीही फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे यामुळे दातांमधील पिवळसरपणाही दूर होतो. स्ट्रॉबेरीमध्ये अधिक प्रमाणात मॅलिक अॅसिड असते. जे अनेक टूथपेस्टमध्येही आढळते. दातांमधील पिवळेपणा काढण्यासाठी आपण स्ट्रॉबेरीजचा वापर करू शकता. यासाठी स्ट्रॉबेरीचा क्रश तयार करा. तयार क्रश दातांवर घासा. काही वेळानंतर पाण्याने गुळण्या करा.

४ प्रकारचे पौष्टिक दूध, वाढलेले कोलेस्टेरॉल होईल कमी, रक्ताभिसरण सुधारेल-हार्ट ॲटॅकचा धोका कमी

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त पदार्थांमध्ये वापरात येत नसून, याचा वापर दात स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा घ्या, त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट दातांवर लावून घासा. आठवड्यातून २ ते ३ वेळा बेकिंग सोड्याने दात घासल्याने काही दिवसात दात चमकतील.

खोबरेल तेल

खोबरेल तेल तोंडातील किटाणू नष्ट करण्यासाठी मदत करू शकते. यासाठी थोडे खोबरेल तेल तोंडात घेऊन गुळण्या करा. नारळाचे तेल दातांच्या प्रत्येक कोपऱ्यात त्वरीत पोहोचते. ज्यामुळे दातांमधील कॅव्हिटी आणि पिवळसरपणा दूर होतो. नियमित ही क्रिया केल्याने दात अधिक मजबूत होतील.

ब्लडप्रेशर-डायबिटिस असेल तरी खा सीताफळ, त्वचेसह आरोग्यासाठी वरदान असलेले मधूर फळ!

मोहरीचे तेल आणि मीठ

मोहरीचे तेल आणि मिठाच्या वापराने दातांची समस्या काही मिनिटात सुटेल. मिठामुळे बॅक्टेरियाचे संसर्ग कमी होईल. शिवाय तोंडातून येणारी दुर्गंधीही कमी होईल. यासाठी मोहरीच्या तेलात मीठ मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट दातांवर लावून घासा. काही वेळानंतर तोंडात पाणी घेऊन गुळण्या करा. यामुळे दात स्वच्छ तर होतीलच शिवाय मजबूतही होतील.

लवंग

लवंग बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. यामुळे दातांमधील कॅव्हिटीची सुटेल. यासाठी लवंग पावडरमध्ये खोबरेल तेल घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये कापसाचा गोळा बुडवून कॅव्हिटीवर लावून चोला. असे केल्याने कॅव्हिटीमधील बॅक्टेरिया नष्ट होतील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्वच्छता टिप्स