दात पिवळे होणे ही एक सामान्य समस्या आहे (Teeth Cleaning). दात पिवळे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी, धूम्रपान, चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन आणि तोंडाच्या स्वच्छतेचा अभाव यामुळे दात पिवळे पडतात (Cleaning Tips). दात पिवळे पडले की आपला आत्मविश्वास कमी होतो (Home Remedies). हसताना किंवा बोलताना, चारचौघात आपल्याला लाजिरवाणे वाटते. दात पिवळे दिसून आले तर अवघडल्यासारखं वाटतं.
बऱ्याचदा ब्रश केल्यानंतरही दातांचा पिवळेपणा निघत नाही. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण बरेच उपाय करतो. शिवाय महागड्या वस्तूंचा वापर करून दात स्वच्छ करतो. जर आपल्या दातांचा पिवळेपणा काही केल्या निघत नसेल तर, बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करून पाहा, दात स्वच्छ होतील(How to Get Rid of Yellow Teeth: baking soda and lemon remedy for teeth).
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर
फक्त टूथपेस्ट किंवा ब्रश करून नाही तर, आपण काही घरगुती उपायांचा वापर करून दात स्वच्छ करू शकता. यासाठी आपल्याला फक्त बेकिंग सोडा आणि लिंबू हवा आहे. बेकिंग सोडा हा एक नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे. जे दातांचा पिवळेपणा दूर करतात. शिवाय लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे दातांचा पिवळेपणा सहज दूर करू शकतात.
FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल
अशा पद्धतीने करा बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर
एका वाटीमध्ये एक टेबलस्पून बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट टूथब्रशवर लावा आणि दातांवर हळुवारपणे घासा. २ मिनिटानंतर पाण्याने गुळण्या करा. या उपायाचा वापर आपण आठवड्यातून एक ते दोन वेळा करू शकता. यामुळे नैसर्गिक उपायामुळे दात स्वच्छ होतील.