Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांचा पिवळटपणा दूर करेल 'ही' घरगुती टुथपेस्ट; दात दिसतील पांढरेशुभ्र- चमकदार

दातांचा पिवळटपणा दूर करेल 'ही' घरगुती टुथपेस्ट; दात दिसतील पांढरेशुभ्र- चमकदार

How to Get Rid of Yellow Teeth :दात स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला केवळ रसायनयुक्त पेस्ट वापरण्याची गरज नाही. याऊलट  तुम्हाला नैसर्गिक  टूथपेस्ट वापरण्याची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 04:09 PM2022-06-23T16:09:12+5:302022-06-23T16:37:23+5:30

How to Get Rid of Yellow Teeth :दात स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला केवळ रसायनयुक्त पेस्ट वापरण्याची गरज नाही. याऊलट  तुम्हाला नैसर्गिक  टूथपेस्ट वापरण्याची गरज आहे.

How to Get Rid of Yellow Teeth : How to make tooth gel with aloe vera homemade toothpaste for yellow teeth | दातांचा पिवळटपणा दूर करेल 'ही' घरगुती टुथपेस्ट; दात दिसतील पांढरेशुभ्र- चमकदार

दातांचा पिवळटपणा दूर करेल 'ही' घरगुती टुथपेस्ट; दात दिसतील पांढरेशुभ्र- चमकदार

आजकाल खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे दातांचे आरोग्य राखणे खूप गरजेचे आहे. कारण असे न केल्यास तुमचे दात अकाली तुटतील किंवा खराब होतील. तसेच कमकुवत दातांमुळे तुम्हाला दात पिवळे पडणे, दातातील पोकळीची समस्या, दात कमकुवत होणे, दुखणे किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या अशा अनेक समस्या किंवा आजारांना सामोरे जावे लागू शकते. (How to Get Rid of Yellow Teeth )

दात स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला केवळ रसायनयुक्त पेस्ट वापरण्याची गरज नाही. याऊलट  तुम्हाला नैसर्गिक  टूथपेस्ट वापरण्याची गरज आहे. जेणेकरुन तुमचे दात तर स्वच्छ राहतीलच पण तुमचे दुखणे किंवा हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या देखील दूर होईल. (Home Remedies for Yellow Teeth)  या टूथपेस्ट खूप महाग आहेत, परंतु तुम्‍ही एलोवेरा जेलच्‍या मदतीने नैसर्गिक पेस्‍ट घरीच वापरू शकता.(Can yellow teeth become white)

दातांसाठी घरगुती जेल कसे बनवायचे? (How to Whiten Your Teeth Naturally at Home)

1 टिस्पून बेकिंग सोडा, 2 कप शुद्ध एलोवेरा जेल, 1.5 टीस्पून मीठ, 2 टीस्पून - पुदिना तेल, पाणी हे साहित्य तुम्हाला दातांचे  जेल बनवण्यासाठी लागेल.

घरच्या घरी एलोवेरा टूथपेस्ट बनवण्यासाठी प्रथम तुम्ही कोरफडीचा गर स्वच्छ करा आणि त्याचे जेल काढा. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून कोरफडीचे जेल बनवा. आता एलोवेरा जेल एका भांड्यात काढा आणि नंतर मीठ, पुदिन्याचे तेल, बेकिंग सोडा इ. सर्व साहित्य टाका. पेस्ट पातळ करायची असेल तर त्यात पाणी घालू शकता. (How to whiten teeth)  सर्व साहित्य एकजीव झाल्यावर काचेच्या बाटलीत काढून ठेवा. ते वापरण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमचा ब्रश स्वच्छ करा.  त्यानंतर तुमच्या गरजेनुसार जेल काढा आणि दात स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच वापरा.

फायदे

१) या घरगुती पेस्टने तुम्ही दातदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. कारण कोरफड दातांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही मीठ वापरत असाल तर तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होऊ शकतो. कारण मिठात आयोटिन आणि सॉर्बिटॉल सारखे घटक असतात, जे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

२) पेपरमिंट तेल दात मजबूत करण्यासाठी काम करेल. शिवाय, हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येपासून मुक्ती देण्याचेही काम करेल. जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही यात काळी मिरी देखील वापरू शकता.
 

Web Title: How to Get Rid of Yellow Teeth : How to make tooth gel with aloe vera homemade toothpaste for yellow teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.