Join us   

दात वरून पिवळे, आतून किड लागली? ७ दिवस ही पान चावून खा- चांदीसारखे चमकतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 5:25 PM

How To Get Rid Of Yellow Teeth : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय  करू शकता.

दातांचा पिवळेपणा कोणापासून लपवला जाऊ शकत नाही. पिवळे दात अनेकदा लाजिरवाणे वाटण्याचं कारण ठरतात. (Oral Health Tips) जर तुम्ही पिवळ्या दातांच्या समस्येनं त्रासलेले असाल तर तुम्ही याच्या ट्रिटमेंट करण्याची काही गरज नाही. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय  करू शकता. (How To Get Rid Of Yellow Teeth) ज्यामुळे घरात असलेल्या पानांच्या मदतीने तुम्ही दात  चमकवू शकता.  तुळशीच्या पानांच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या बऱ्या होतात. दात आणि चेहऱ्यासाठीही फायदेशीर ठरते. तुळशीत दातं पांढरे करण्यासाठी ब्लीच करण्याची क्षमता असते. (How To Tulsi For Teeth Whitening)

रिसर्चनुसार टूथपेस्टच्या स्वरूपात तुळशीचा समावेश केल्याने  दातांचे आरोग्य चांगले राहते. १४ ते १५ वर्षांच्या मुलांमध्ये तुळशीचे दातांवर होणारे परिणाम तपासण्यात आले. (Ref) यात बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. तुळशीच्या सेवनाने दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

लांबचं धूसर दिसतं-चष्मा नको वाटतो? रोज ७ पदार्थ खा, नजर होईल तेज-डोळ्याचे आरोग्य सुधारेल

ज्या लोकांच्या दातांमध्ये वेदना असतात त्यांच्यासाठी तुळशीची पानं हा रामबाण उपाय आहे. तुळशीची पानं व्यवस्थित चावून खा. ज्यामुळे वेदनांची समस्या कमी होईल. तोंडातील संक्रमणामुळे दुर्गंध येऊ  लागतो अशा स्थितीत लोक तुमच्याशी बोलायला खूपदा विचार करतात.  अभ्यासातून हे समोर आलं की तुळशीची पानं ओरल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि संक्रमणाचा धोकाही टळतो.

सगळ्यात आधी १५ ते २० ताजी तुळशीची पानं वाटून घ्या. वाटलेली पानांपासून नैसर्गिक टुथपेस्ट बनवा. ही पेस्ट सकाळी आणि रात्री झोपण्याआधी दातांना लावून ब्रश करा किंवा तुळशीच्या पानांना व्यवस्थित सुकवून याची पावडर बनवून मंजनप्रमाणे वापर करा. तुळशीची पानं धुवूनसुद्धा तुम्ही चावू शकता. तुळशीची पानं दात चमकवण्याबरोबरच तोंडाच्या अनेक समस्या टाळण्यास फायदेशीर ठरतात.

दातांच्या समस्या टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा

१) दातांच्या डागांपासून बचावासाठी सिगारेट ओढू नका. याव्यतिरिक्त कॉफी, सोडा, तंबाखू यांचा उपयोग करू नका. जर स्ट्रॉने सोडा पित असाल तर दातांचा रंग खराब होणं टाळता येऊ शकतं.

एकादशीला करा खमंग उपवासाचे मेदूवडे, १ वाटी भगरीचे २० कुरकुरीत वडे-पचायलाही हलके

२) जंक फूडचे सेवन कमी प्रमणात करा.  याऐवजी आपल्या  आहारात सफरचंद, गाजर, स्ट्रोबेरी आणि ओवा यांसारख्या फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल