Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर पिवळा थर आलाय? २ मिनिटांत दूर करतील ही पानं-असा वापर करा, टुथपेस्ट लावणंच विसराल

दातांवर पिवळा थर आलाय? २ मिनिटांत दूर करतील ही पानं-असा वापर करा, टुथपेस्ट लावणंच विसराल

How To Get Rid Of Yellow Teeth Naturally : अनेकदा दातांचा पिवळेपणा दूर होण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इतकंच नाही तर लोकांना त्रासाचा सामना करावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:35 PM2024-09-30T12:35:22+5:302024-09-30T13:10:02+5:30

How To Get Rid Of Yellow Teeth Naturally : अनेकदा दातांचा पिवळेपणा दूर होण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इतकंच नाही तर लोकांना त्रासाचा सामना करावा लागतो.

How To Get Rid Of Yellow Teeth Naturally At Home Yellow Teeth Cleaning Tips | दातांवर पिवळा थर आलाय? २ मिनिटांत दूर करतील ही पानं-असा वापर करा, टुथपेस्ट लावणंच विसराल

दातांवर पिवळा थर आलाय? २ मिनिटांत दूर करतील ही पानं-असा वापर करा, टुथपेस्ट लावणंच विसराल

व्यक्तीच्या हसण्यामागे दातांची महत्वाची भूमिका असते. काही तंबाखू, सिगारेट यांमुळे आपले दात खराब करून घेतात. पण काहीजण यातलं काहीच खात नाहीत तरीही त्यांचे दात पिवळे होतात. अनेकदा पिवळे दात लपवण्याच्या नादात लोक मोकळेपणाने हसत नाहीत. (How To Get Rid Of Yellow Teeth Naturally At Home) अनेकदा दातांचा पिवळेपणा दूर होण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इतकंच नाही तर लोकांना त्रासाचा सामना करावा लागतो. अनेकदा आजारपण आणि औषधांमुळे दातांचा रंग पिवळा पडू लागतो. पिवळ्या दातांचा त्रास टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून बघायला हवेत. ज्यामुळे काही दिवसांतच तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होईल आणि तुम्हाला सुंदर स्माईल मिळेल. (Yellow Teeth Cleaning Tips)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार कडुलिंबाच्या काडीत एंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे  बरेच फायदेशीर ठरते. कडुलिंबात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे इम्यून रिस्पॉस वाढतो. माऊथ अल्सर आणि पेन रिलिफ होण्यासाठी फायदेशीर ठरतं. एंटी बॅक्टेरिअल एक्टिव्हीटी असलेलं कडुलिंबात नॅच्युरल एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. अनेक वैज्ञानिक अभ्यासातून दिसून येते की एंटीबॅक्टेरिअल एक्टिव्हिटीजमुळे दात स्वच्छ राहण्यास मदत होते.

आयुर्वेद डॉक्टर रास बिहारी तिवारी यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना सांगितले की दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक प्रकारची पानं, हर्बल चहाचा वापर तुम्ही करू शकता. यात प्रमुख कडुलिंबाची पानं असतात. याचा लोक पारंपारीक पद्धतीने तोंडाची साफ-सफाई आणि दातांची रंगत वाढवण्यासाठी करत आहेत. त्यांनी सांगितले की कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुण असतात.

कोण म्हणतं बटाटे-भात खाल्ल्यानं वजन वाढतं? हेल्दी कार्ब्सयुक्त ४ पदार्थ खा, मेंटेन राहाल

ज्यामुळे तोंडात बॅक्टेरिया आणि फंगसशी लढण्यास मदत होते. इतकंच नाही कडुलिंबाच्या पानांचा सतत वापर केल्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीज आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. याच्या नियमित वापरानं प्लेक आणि टार्टर कमी होण्यास मदत होते आणि दात स्वच्छ राहतात. 

आयुर्वेद चिकित्स सांगतात की कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. सतत हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. तोंडातून दुर्गंध येत नाही. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या काडीने गुळण्या करायला हव्यात.

पोट सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी

कडुलिंब पाण्यात उकळवून घ्या जेव्हा पाणी आटू लागेल तेव्हा गॅस बंद करा नंतर स्वच्छ पाण्यानं गुळण्या करा. ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येणार नाही. याशिवाय कडुलिंबाच्या सालीची पावडर आणि कडुलिंबाची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. 

Web Title: How To Get Rid Of Yellow Teeth Naturally At Home Yellow Teeth Cleaning Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.