Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर पिवळा चिकट थर-किड लागली? किचनमधले ५ पदार्थ लावा; पांढरेशुभ्र होतील दात

दातांवर पिवळा चिकट थर-किड लागली? किचनमधले ५ पदार्थ लावा; पांढरेशुभ्र होतील दात

How to Get Rid Of Yellow Teeth : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणिकिड येऊ नये म्हणून कोणते घरगुती उपाय करता येतील पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:52 AM2024-02-06T11:52:53+5:302024-02-06T14:01:48+5:30

How to Get Rid Of Yellow Teeth : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणिकिड येऊ नये म्हणून कोणते घरगुती उपाय करता येतील पाहूया.

How to Get Rid Of Yellow Teeth : Simple Home Remedies To Whiten Your Teeth Naturally | दातांवर पिवळा चिकट थर-किड लागली? किचनमधले ५ पदार्थ लावा; पांढरेशुभ्र होतील दात

दातांवर पिवळा चिकट थर-किड लागली? किचनमधले ५ पदार्थ लावा; पांढरेशुभ्र होतील दात

दात (Teeth) वेगवेगळ्या कारणामुळे पिवळे पडू शकतात. दात जास्त पिवळे दिसत असतील तर दातांना पुन्हा  पांढरे करण्यासाठीकाही सोपे उपाय करावे लागतील. (Natural Ways To Whiten Your Teeth) दातांची योग्य पद्धतीने साफ सफाई करण्यासाठी पिवळेपणा दूर करण्यासाठी  तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि दातांमध्ये  किड येऊ नये म्हणून कोणते घरगुती उपाय करता येतील पाहूया. (How to Get Rid Of Yellow Teeth) दातांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले तर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

१) केळ्याचे साल

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी केळीचे साल एक उत्तम उपाय आहे. (Ref) यात मॅग्नेशियम, मॅन्गनीज, पोटॅशियम आणि खनिज असतातं. केळाच्या सालं आतून पोषण मिळते. दातांवर घासा आणि तोंड व्यवस्थित धुवून  घ्या. सकाळी आणि संध्याकाळी ही प्रक्रिया करा ज्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होईल.

२) बेकिंग सोडा

पिवळ्या दातांवर बेकींग सोडा लावल्यास दात पांढरेशुभ्र दिसतात. बेकिंग सोडा एका वाटीत काढून घ्या त्यात पाणी  घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावा आणि तोंड व्यवस्थित व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. दातांवर पिवळेपणा येणार नाही.

३) कडुलिंब आणि बाभूळ

दातांचा घाणेरडेपणा घालवण्यासाठी आणि दात पांढरेशुभ्र दिसावेत यासाठी बाभळीचा वापर करू शकता. कडुलिंब बाभळीसाठी उत्तम ठरते.  एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात ज्यामुळे दात किडत नाही आणि भरपूर फायदे मिळतात.

जेवण कधी आणि कसं करावं? रामदेव बाबा सांगतात जेवणाचे १० बेसिक नियम,आजार दूर-फिट राहाल

४) स्ट्रॉबेरीज आणि बेकिंग सोडा

स्ट्रोबेरीज आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळून दातांना लावल्यास  दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल. स्ट्रॉबेरीजमध्ये मॅलिक एसिड असते. दातांवरील डाग निघून जातात. एक चमचा बेकींग सोडा आणि एक स्ट्रोबेरी कुटून घ्या ही पेस्ट दातांवर मिसळून काही वेळासाठी तसंच लावून ठेवा नंतर दात चमकतील.

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

५) नारळाचे तेल

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसनच्या रिपोर्टनुसार नारळाच्या तेलात ऑईल पुलिंग केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. दातांची किड दूर होण्यासही मदत होते.  तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होते. (Ref) यासाठी नारळाचं तेल तोंडात फिरवून फिरवून घ्या. एक ते 2 मिनिटं नारळाचे तेल तोंडात फिरवून गुळण्या करा. यामुळे तोंड स्वच्छ राहण्यास मदत होईल.

Web Title: How to Get Rid Of Yellow Teeth : Simple Home Remedies To Whiten Your Teeth Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.