पांढरेशुभ्र दात सौंदर्यात भर पाडत असतात. आपले दात नीटनेटके, व्यवस्थित असावे असं प्रत्येकालाच वाटतं. पण दररोज दातांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर दात पिवळे होत जातात ज्यामुळे ओव्हर ऑल लूक्सवर याचा परीणाम होतो. दात पिवळे पडण्याचं सगळ्यात मोठे कारण प्लेक आहे. (6 Natural Ways To Whiten Your Teeth) खाण्यापिण्याच्या पदार्थांमुळे दातांवर प्लेक जाम होते. हळूहळू याचे टार्टरमध्ये रुपांतर होते. आणि दातांच्या मुळाशी जाऊन ते हिरड्यांना कमकुवत बनवते. (How to Get Rid of Yellow Teeth)
वेळीच टार्टरची स्वच्छता केली नाही तर दात पिवळे पडतात. दातांमध्ये वेदना, दात किडणे, हिरड्यांचे आजार, हिरड्यांमधून रक्त येणं, तोंडातून दुर्गंधी, पायरिया आणि कॅव्हिटीज यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. टार्टर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदीक उपायांचा अवलंब करू शकता. (How to Naturally Whiten Your Teeth at Home)
एपल साडर व्हिनेगर
एपल सायडर व्हिनेगर एक नॅच्युरल एसिड आहे. जे दातांवरचा पिवळेपणा दूर करते. यासाठी सगळ्यात आधी कप पाण्यात एक मोठा चमचा एपल सायडर व्हिनेगर मिसळा. १ ते २ वेळा तोंडात फिरवून घ्या. त्यानंतर पाण्यानं गुळण्या करा. एपल सायडर व्हिनेगरचा जास्त वापर केल्यानं तुमच्या दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचू शकते.
पेरूची पानं
आंबा आणि पेरूची पानं दातांवर घासल्यानं दात पांढरेशुभ्र होण्यास मदत होते. ही पानं क्लिनरच्या स्वरूपात कार्य करतात. यात तुम्ही लसूण सैंधव मीठ, पेरू आणि आंब्याच्या पानांची पावडर मिसळू शकता. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.
एलोवेरा
एलोवेराचे असंख्य फायदे आहेत. दातांवर जमा झालेला पिवळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा एलोवेरा जेलमध्ये चार चमचे ग्लिसरिन, १ मोठा चमचा बेकींग सोडा, इसेंशियल ऑईलचे काही थेंब आणि १ कप पाणी मिसळा आणि दातांवर घासा. ५ मिनिटांनी तोंड स्वच्छ धुवा. हे मिश्रण प्लेक आणि टार्टर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते.
मीठ आणि मोहोरीचं तेल
आयुर्वेदात मीठ आणि मोहोरीच्या तेलाला आजारांवरचे एक उत्तम पारंपारीक उपचार मानले जाते. डॉक्टरांच्यामते नियमित मोहोरीचे तेल आणि मीठाने दातांची स्वच्छता केल्यानं केवळ दात चमकत नाहीत तर फक्त हिरड्यांची सूज कमी होते. यासाठी एक चमचा मीठात एक चमचा मोहोरीचं तेल मिसळा आणि दात आणि हिरड्यांवर घासा यानंतर पाण्यानं गुळण्या करा.