Join us   

रात्री लवकर झोप येत नाही? फक्त १ उपाय; स्ट्रेस कमी होऊन लागेल शांत झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 6:02 PM

How to Get Sleep Fast : आरोग्य तज्ज्ञ जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस करतात. रोजच्या दिनचर्येत मेडिटेशनचा समावेश करून या समस्येपासून आराम मिळवू शकता.

रोजची दगदग, जीवनशैलीतील अनियमितता यामुळे शांत झोपच येत नाही. बराचवेळ पडून राहिल्यानंतर झोप न लागल्यानं तर लोक टिव्ही किंवा मोबाईलचा वापर करतात. झोप व्यवस्थित झाली नाही तर संपूर्ण दिवस तर खराब जातोच याशिवाय डार्क सर्कल्स येणं, अपचन, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणं अशा समस्या उद्भवतात. (How to Get Sleep Fast) या समस्या टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस करतात. रोजच्या दिनचर्येत मेडिटेशनचा समावेश करून या समस्येपासून आराम मिळवू शकता. ध्यानाचा सराव शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हा सराव मज्जासंस्थेला शांत करून मेंदूचे कार्य सुलभ करण्यात मदत करतो. (Meditation A simple fast way to reduce stress)

न्यूरोसायंटिस्ट्सच्या मते, माइंडफुलनेस मेडिटेशन केवळ मानसिक शांततेसाठी प्रभावी नाही तर ते तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा धोका देखील कमी करू शकते. शारीरिक आरोग्यासाठीही ध्यान प्रभावी मानले जाते. ज्यांना झोपेच्या विकारांची समस्या कायम आहे त्यांच्यासाठी ध्यानाचा सराव करणे हे एका प्रभावी औषधापेक्षा कमी नाही.  (How can I fall asleep immediately)

जेवल्यानंतर रोज ‘किती’ वेळ चाललं तर आजार कायमचे दूर राहतील; तब्येतही राहील फिट

पेन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी नोंदवले की माइंडफुलनेस मेडिटेशन हे डोकेदुखी आणि इतर अनेक प्रकारच्या वेदना कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. (How to Fall Asleep Fast in 10) ध्यानामुळे मेंदूच्या वेदनांच्या आकलनासाठी जबाबदार असलेल्या भागांमधील माहितीचा प्रवाह बंद होतो. मज्जातंतूंना शांत करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे डोकेदुखीमध्ये खूप आराम मिळतो. डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळून चांगली झोप येण्यास मदत होते.

पावसाळ्यात सर्दी -खोकला, व्हायरल इन्फेक्शनला लांब ठेवतील ५ पदार्थ; रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल

मेडीटेशनचे फायदे

भावनिक आणि शारीरिक फायदे मिळविण्यासाठी ध्यान हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्याचे अनेक अभ्यासांनी दर्शविले आहे, तणावपूर्ण परिस्थितीत नवीन दृष्टीकोन प्राप्त करण्यास मदत होते, तुमच्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायाम उपयुक्त आहे, आत्म-जागरूकता वाढते, लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उपयुक्त व्यायाम आहे, नकारात्मक भावना कमी होते. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते, सहनशीलता वाढते.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोविड महामारीपासून अनेक प्रकारच्या अनिश्चिततेचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे, ज्यामुळे तणाव-चिंतेसारख्या समस्यांचा धोका लक्षणीय वाढला आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास डिप्रेशनची समस्याही वाढते. ध्यानाचा सराव करून सर्व वयोगटातील लोकांना याचा फायदा होऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य