Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शांत झोपेसाठी तज्ज्ञांनी सांगितला ४- ७- ८ चा फॉर्म्युला!! बघा झोपण्यापुर्वी नेमकं काय करायचं

शांत झोपेसाठी तज्ज्ञांनी सांगितला ४- ७- ८ चा फॉर्म्युला!! बघा झोपण्यापुर्वी नेमकं काय करायचं

Home Remedies to get Sound Sleep: रात्री लवकर झोप लागत नाही, शांत झोप येत नाही, हा त्रास अनेक जणांना असतो. त्यावर तज्ज्ञांनी एक उत्तम उपाय सांगितला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 03:23 PM2022-09-24T15:23:14+5:302022-09-24T15:24:38+5:30

Home Remedies to get Sound Sleep: रात्री लवकर झोप लागत नाही, शांत झोप येत नाही, हा त्रास अनेक जणांना असतो. त्यावर तज्ज्ञांनी एक उत्तम उपाय सांगितला आहे.

How to get sound sleep? 4-7-8 formula for sleep?  | शांत झोपेसाठी तज्ज्ञांनी सांगितला ४- ७- ८ चा फॉर्म्युला!! बघा झोपण्यापुर्वी नेमकं काय करायचं

शांत झोपेसाठी तज्ज्ञांनी सांगितला ४- ७- ८ चा फॉर्म्युला!! बघा झोपण्यापुर्वी नेमकं काय करायचं

Highlightsही क्रिया एकूण 4 वेळा करावी आणि त्यानंतर झोपून जावे.  काही दिवसातच शांत आणि पूर्ण झोप होण्यास मदत होईल. 

तब्येत उत्तम ठेवायची असेल, तर झोपेचं (sound sleep) चक्र वेळेवर असणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा आपण नेमकं त्याच्याकडेच दुर्लक्ष करतो. रात्री झोपायला उशीर आणि सकाळी उठायला उशीर हे अनेकांचं गणित असतं. त्यात पुन्हा अनेक जण रात्री बराच वेळ स्क्रिन (increasing screen timing at night) पाहण्यात घालवतात. त्यामुळे मग शरीराला तशीच सवय होत जाते. याचाच परिणाम म्हणजे मग रात्री लवकर बेडवर पडलं तर झोप लागता लागत नाही. झोप लागली तरी शांत झोप येत नाही. हे असंच सुरू राहून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून शांत झोप लागण्यासाठी हा 4-7-8 फॉर्म्युला (4-7-8 formula for sleep) वापरून बघा.

 

काय आहे फॉर्म्युला 4-7-8?
१.अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर ॲण्ड्रीव्ह्यू वील यांनी एका चॅनलवर मुलाखत देताना हा फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय पूर्णपणे श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.

२. या पद्धतीनुसार तुमची जीभ वरच्या समोरच्या दातांच्या मागच्या बाजूने लावा. मनातल्या मनात 4 पर्यंत आकडे मोजा.

३. त्यानंतर जीभ तशाच अवस्थेत ठेवून एक दीर्घ श्वास घ्या.

४. आता मनातल्या मनात ७ पर्यंत आकडे मोजा आणि तोपर्यंत श्वास रोखून ठेवा. 

५. त्यानंतर मनातल्या मनात ८ पर्यंत आकडे मोजा आणि त्यावेळेत हळूहळू श्वास सोडा.

६. ही क्रिया एकूण 4 वेळा करावी आणि त्यानंतर झोपून जावे. 

७. काही दिवसातच शांत आणि पूर्ण झोप होण्यास मदत होईल. 

 

शांत झोप लागण्यासाठी इतर उपाय 
१. रात्रीच्या वेळी खूप जड आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

२. दररोज अर्धा तास तरी व्यायाम करावा.

३. झोपण्यापुर्वी १५ ते २० मिनिटे वॉकिंग करावे

४. सायंकाळी ६ नंतर चहा- कॉफी, कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे. 

 

Web Title: How to get sound sleep? 4-7-8 formula for sleep? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.