Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

Health Tips For Healthy Bones: हल्ली कमी वयातच गुडघ्याचं दुखणं मागे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी नेमकं काय करावं? (how to get strong bones?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 13:10 IST2025-01-31T13:08:47+5:302025-01-31T13:10:08+5:30

Health Tips For Healthy Bones: हल्ली कमी वयातच गुडघ्याचं दुखणं मागे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी नेमकं काय करावं? (how to get strong bones?)

how to get strong bones, super food for bone health, how to get rid of joint pain? | वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! 'हा' पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

Highlightsएक खास पदार्थ रोज घरातल्या सगळ्यांनीच खायला पाहिजे; अगदी लहान मुलांनीही...

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत नाही. त्यामुळे कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागत आहे (super food for bone health). हा त्रास टाळण्यासाठी एक खास पदार्थ रोज घरातल्या सगळ्यांनीच खायला पाहिजे (how to get rid of joint pain?). अगदी लहान मुलांनीही तो खायला पाहिजे. तो पदार्थ नेमका कोणता ते पाहूया..(how to get strong bones?)

 

सांधेदुखी, हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी उपाय

कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागू नये आणि एवढंच नाही तर अगदी म्हातारपणीही हाडं दणकट राहावीत, यासाठी काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती डॉक्टरांनी drsaleem4u या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

गोड खाण्याची इच्छा झाल्यास 'हे' पदार्थ खा! वजन वाढणार नाही, तब्येतही होईल ठणठणीत

यामध्ये डॉक्टर सांगतात की हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातला सगळ्यात उत्तम पदार्थ म्हणजे तीळ. त्यामुळे फक्त संक्रांतीच्या काळातच नाही तर रोजच साधारण १ चमचा तीळ तरी आपण नियमितपणे खायलाच पाहिजेत. 

कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? आलिया भट, नीता अंबानींचे हेअर स्टायलिस्ट सांगतात ४ टिप्स

तिळांमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. पण त्यासोबतच फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम हे पदार्थही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे हाडं अधिक बळकट होण्यास मदत होते.

 

तीळ खाण्याची योग्य पद्धत

डॉक्टर सांगतात की पुढे सांगितलेल्या कोणत्याही पद्धतीनुसार तीळ खाल्ले तरी तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होतील.

१. तीळ थोडेसे भाजून एका बरणीत ठेवा आणि दररोज सकाळी एक चमचा खा.

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

२. जर तुम्हाला नुसतेच भाजलेले तीळ खायला आवडत नसेल तर लसूण, लाल तिखट, जिरे घालून तिळाची खमंग चटणी करा आणि ही १ चमचा चटणी दररोज जेवणात तोंडी लावा.

३. जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असेल तर तीळ आणि गूळ घालून तिळाचे लाडू तयार करा किंवा चिक्की तयार करा आणि दररोज ती थोडी थोडी खा.


 

Web Title: how to get strong bones, super food for bone health, how to get rid of joint pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.