Join us   

भयंकर उकाडा, रात्री झोपच लागत नाही? ७ उपाय- घाम कमी-झोपही लागेल शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 2:38 PM

How To Get Through The Hot, Sleepless Summer Nights उकाड्यानं हैराण झालं की झोप लागत नाही पण त्यावर उपाय काय?

 असह्य झाला आहे सध्याचा उन्हाळा. प्रचंड घाम, चिपचिप, अंगाची लाही लाही. उकाड्यानं हैराण जीव.  त्यात रात्री इतका उकाडा की नीट झोप लागत नाही. पंख्याचं वारं, कुलरची हवा आणि आवाज नको. एसीही सतत चालू बंद केला की तब्येत बिघडते. झोप कमी की दिवसभर थकवा, चिडचिड.  पण उपाय काय भयंकर उकाड्यात काय केलं तर रात्री शांत झोप लागेल. त्यासाठीच हे काही उपाय(How To Get Through The Hot, Sleepless Summer Nights).

स्क्रिन बंद-दिवे बंद

उन्हाळ्यात आपली खोली थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. संगणक, टेलिव्हिजन, ट्यूबलाईट, बल्ब बंद करा. झोपण्यापूर्वी काही वेळ आधी लाइट बंद करा ज्यामुळे जरा शांत थंड वाटेल.

१ कप गुलकंद सरबत उन्हाळ्यात रोज प्या! कॉन्स्टिपेशनचा भयंकर त्रास, ॲसिडिटी - गायब!

कॉटन बेडशीट

उन्हाळ्यात बेडवर झोपल्यानंतर पाठीतून घाम निघतो. हे टाळण्यासाठी बेडवर कॉटन बेडशीट घाला. गडद रंगाची आणि जाड मटेरियल कॉटन शीट्स वापरणे टाळा. नायलॉन, सिल्क आणि पॉलिस्टर शरीराचे तापमान वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलक्या रंगाच्या कॉटनच्या बेडशीट वापरा.

हलके कपडे घाला

रात्री झोपताना नायलॉन, टाईट कपडे घालणे टाळा. या कपड्यांमुळे शरीराला हवा मिळत नाही. रात्रीच्या वेळी सैल सुती कपडे घाला.

भात खाल्ल्याने वजन वाढते, मग पोहे खा! तज्ज्ञ सांगतात, भरपूर भाज्या घालून पोहे खाण्याचे फायदे

आईस पॅकचा करा वापर

आपल्या उशी जवळ आईस पॅक ठेवा. किंवा थंड बॉटल ठेवा. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत मिळते.

चटईवर झोपा

गादीवर झोपल्याने पाठीवर उबदारपणा जाणवतो. ज्यामुळे झोपमोड होते. जर उष्णतेमुळे आपल्याला झोप येत नसेल तर, गादीवर झोपण्याऐवजी चटईवर झोपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे शरीर थंड राहेल, व शांत झोप लागेल.

झोपण्यापूर्वी आंघोळ करा

काही लोकांना झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची सवय असते. रात्रीच्या वेळी आंघोळ करून झोपल्याने शरीरातून उष्णता निघून जाते. ज्यामुळे थंडावा जाणवतो. यासह शरीराचे तापमान कमी होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करा.

झोपताना खिडक्या बंद करू नका

रात्री झोपण्यापूर्वी खिडक्या खोलून ठेवा. ज्यामुळे खोलीत हवा खेळती राहील. व गरमीची समस्या देखील छळणार नाही.

टॅग्स : समर स्पेशलहेल्थ टिप्स