Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसात भिजल्यानं किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेलं? ३ उपाय पाणी निघेल- कानाची ‘अशी’ घ्या काळजी

पावसात भिजल्यानं किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेलं? ३ उपाय पाणी निघेल- कानाची ‘अशी’ घ्या काळजी

How to Get Water Out of Your Ears: 3 Easy Tips : कानात गेलेलं पाणी बाहेर कसं काढायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 03:00 PM2024-06-25T15:00:57+5:302024-06-25T15:02:47+5:30

How to Get Water Out of Your Ears: 3 Easy Tips : कानात गेलेलं पाणी बाहेर कसं काढायचं?

How to Get Water Out of Your Ears: 3 Easy Tips | पावसात भिजल्यानं किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेलं? ३ उपाय पाणी निघेल- कानाची ‘अशी’ घ्या काळजी

पावसात भिजल्यानं किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेलं? ३ उपाय पाणी निघेल- कानाची ‘अशी’ घ्या काळजी

अनेकदा पावसात भिजताना, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करताना, कानात पाणी जाण्याची शक्यता निर्माण होते (Water out of Ears). कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. शिवाय कानातून पाणी नाही निघाल्यास, इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो (Cleaning Tips). अनेकदा कानातून आवाजही ऐकू येऊ लागतो. कानात पाणी गेल्यानंतर आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो (Ear care). पण पाणी काही निघत नाही. कान फार नाजूक असतात.

कानातून जर पाणी निघत नसेल तर, हेल्थ शॉट्सला माहिती देताना डॉ. ज्योतिर्मय एस. हेगड यांनी ३ उपाय सांगितले आहेत. त्या म्हणतात, 'केस धुताना किंवा इतर गोष्टी करताना, कानात पाणी जाण्याची शक्यता वाढते. हे पाणी इअर कॅनलमध्ये जाऊन अडकते. जर आपल्याला हे पाणी काढायचं असेल तर, विशेष पद्धतींच्या मदतीने आपण पाणी काढू शकता'(How to Get Water Out of Your Ears: 3 Easy Tips).

'या' टिप्सच्या मदतीने कानात अडकलेले पाणी काढा

डोकं एका बाजूला झुकवा

गुरुत्वाकर्षण टिल्टच्या मदतीने आपण कानात अडकलेले पाणी काढू शकता. यासाठी ज्या कानात पाणी गेलं आहे, त्या दिशेने आपले डोके वाकवा. नंतर हळू हळू एका पायावर उडी मारा. त्यामुळे पाणी बाहेर काढण्यास मदत होईल. या उपायामुळे इअर कॅनलमधून पाणी निघेल.

पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

यॉनिंग आणि चघळणे

इअर मसल्सला स्टिम्यूलेट करण्यासाठी यॉनिंग किंवा चघळणे फायदेशीर ठरू शकते. या उपायामुळे युस्टाचियन ट्यूब्स उघडण्यास मदत होते. ज्यामुळे इअर कॅनलमधून पाणी निघण्यास मदत मिळते.

डाळ शिजत घालण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करता का? डाळ भिजत घालायला विसरता का? डाळ शिजत घालण्यापूर्वी...

हेअर ड्रायर

इअर ड्रायरच्या मदतीने आपण कानातून अडकलेले पाणी सहज काढू शकता. गरम वाफेमुळे इअर कॅनलमधून पाणी बाष्पीभवन होण्यास मदत होते. कानातून पाणी बाहेर काढण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. 

Web Title: How to Get Water Out of Your Ears: 3 Easy Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.