Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १८ वर्षे वय पूर्ण झाल्यावर मुलांची उंची वाढत नाही? एक्सपर्ट सांगतात, मुलांना ३ गोष्टींची सवय लावा; उंची वाढेल आणि..

१८ वर्षे वय पूर्ण झाल्यावर मुलांची उंची वाढत नाही? एक्सपर्ट सांगतात, मुलांना ३ गोष्टींची सवय लावा; उंची वाढेल आणि..

How to Grow Taller After Puberty: Real Ways to Gain Height : मुलांची उंची वाढतच नसेल तर या सोप्या गोष्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 06:05 PM2024-09-12T18:05:30+5:302024-09-12T18:45:10+5:30

How to Grow Taller After Puberty: Real Ways to Gain Height : मुलांची उंची वाढतच नसेल तर या सोप्या गोष्टी करा

How to Grow Taller After Puberty: Real Ways to Gain Height | १८ वर्षे वय पूर्ण झाल्यावर मुलांची उंची वाढत नाही? एक्सपर्ट सांगतात, मुलांना ३ गोष्टींची सवय लावा; उंची वाढेल आणि..

१८ वर्षे वय पूर्ण झाल्यावर मुलांची उंची वाढत नाही? एक्सपर्ट सांगतात, मुलांना ३ गोष्टींची सवय लावा; उंची वाढेल आणि..

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात (Height). काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी असल्याने अनेक गोष्टीत माघार घ्यावी लागते. उंची ही १८ वयापर्यंतच वाढते असं म्हणतात (Health Tips). पण हे खरं आहे का? १८ वयानंतर उंची वाढत नाही का? उंची वाढवण्यासाठी पालक मुलांना पौष्टिक आहार, जीवनशैलीत बदल आणि व्यायामही करायला सांगतात.

यासंदर्भात एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. राहुल चौडा म्हणतात, '१८ वर्षांनंतर उंचीमध्ये मोठे बदल क्वचितच दिसून येतात, पण योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे हाडे आणि पॉस्चरमध्ये बदल होऊ शकते. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने समृद्ध संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे ऊंची आणि एकूणच आरोग्य सुधारू शकते'(How to Grow Taller After Puberty: Real Ways to Gain Height). 

१८ वर्षानंतर उंचीमध्ये बदल घडू शकते का?

- १८ वर्षानंतर उंचीमध्ये फारसा बदल होत नाही. पौष्टिक आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी यामुळे शरीरात बरेच बदल घडतात. यामुळे शरीर फिट होते. आपण ही सवयी मुलांना १८ वर्षाआधी लावू शकता.

- पोषणतज्ज्ञ तन्वी चौहान सांगतात, 'लहानपणापासून मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला पोषकतत्त्वांची गरज असते.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ झाली? ३ गोष्टी करून पाहा; वाढेल ताकद - पन्नाशीतही राहाल फिट

- स्नायू तयार करण्यात प्रथिने खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय हाडांच्या विकासासाठीही ते महत्त्वाचे आहे. कडधान्ये, काजू आणि सोयाबिनमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात.

उंची वाढवण्यासाठी काय मदत करू शकते?

- कॅल्शियम - कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. दूध, हिरव्या पालेभाज्या आणि फोर्टिफाइड पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

- व्हिटॅमिन डी - कॅल्शियमचे योग्य शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. आपण व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ खाऊ शकता.

फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ब्रेड कडक - चवही बिघडली? शेफ म्हणतात १ ट्रिक वापरुन पाहा; मिनिटात ब्रेड फ्रेश

- प्रथिने - स्नायूंच्या विकासासाठी आहारात प्रथिने असणे गरजेच आहे. यासह वेट लॉससाठी मदत होते. अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिने असते.

- झिंक - झिंकच्या कमतरतेमुळे उंचीवर परिणाम होते. यासाठी आहारात कडधान्यांचा समावेश करा.

- केवळ पोषणच नाही तर जीवनशैलीतील काही बदलही उंची वाढवण्यास मदत करू शकतात. जसे की, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, पुरेशी झोप आणि शरीर हायड्रेट ठेवणंही गरजेच आहे. 

Web Title: How to Grow Taller After Puberty: Real Ways to Gain Height

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.