Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवताना जीभ चावली - दाताखाली आली? चटकन करा ५ उपाय - आग होईल कमी...

जेवताना जीभ चावली - दाताखाली आली? चटकन करा ५ उपाय - आग होईल कमी...

5 Tips To a Soothe a Burnt Tongue : अनेक वेळा गरमागरम चहा, कॉफी पिताना किंवा काहीही गरम खाताना जीभ जळते. यामुळे खूप त्रास होतो, खाण्यात अडचणी येतात.... यासाठी काही सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 09:20 AM2023-06-08T09:20:01+5:302023-06-08T09:25:01+5:30

5 Tips To a Soothe a Burnt Tongue : अनेक वेळा गरमागरम चहा, कॉफी पिताना किंवा काहीही गरम खाताना जीभ जळते. यामुळे खूप त्रास होतो, खाण्यात अडचणी येतात.... यासाठी काही सोप्या टिप्स...

How To Heal Burnt Tongue 5 Effective Home Remedies | जेवताना जीभ चावली - दाताखाली आली? चटकन करा ५ उपाय - आग होईल कमी...

जेवताना जीभ चावली - दाताखाली आली? चटकन करा ५ उपाय - आग होईल कमी...

जीभ हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे. जीभ हा डोळ्यांप्रमाणेच एक संवेदनशील भाग आहे. कारण चमचमीत, तिखट, गोड, आबंट, कडू, खारट या सर्व चवींचा आस्वाद आणि आनंद आपण जीभेत असलेल्या चवी ओळखण्याच्या गुणधर्मामुळेच घेऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांची काहीवेळा बोलताना, जेवताना जीभ अचानकपणे चावली जाते. अशावेळी वेदना तर होतातच पण पाणी पिताना देखील त्याचा दाह सहन करावा लागतो. कधी अचानकपणे जीभ दाताखाली चावणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु या छोट्याशा समस्येमुळे जेवताना किंवा काहीही खाताना खूप त्रास सहन करावा लागतो. 

जीभ दातांखाली चावल्यानंतर इतक्या असह्य वेदना होतात की या समस्येला कसे तोंड द्यावे हेच नेमके समजत नाही. काहीवेळा जीभ इतक्या जोरात चावली जाते की, जिभेला जखम होते, रक्त येत आणि ही जखम लगेच बरी होणारी देखील नसते. त्यामुळे ही जखम बरी होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. जोपर्यंत ही जखम बरी होत नाही तोपर्यंत काही खाणे - पिणे फारच कठीण होऊन बसते. जीभ चावण्यासोबतच काहीवेळा गरम अन्नपदार्थ खाताना जीभ भाजली देखील जाते. भाजलेल्या जिभेने काही खाणे सहन न होणारे असते. जीभ चावल्यानंतर तसेच गरम अन्नपदार्थ खाल्ल्यावर भाजली की ती बरी होण्यासाठी आपण असंख्य उपाय करून पाहतो. आज असेच काही घरगुती आजीच्या पोतडीतील उपाय समजून घेऊयात(How To Heal Burnt Tongue 5 Effective Home Remedies).

जीभ भाजल्यानंतर किंवा चावल्यानंतर नेमके काय उपाय करावेत ? 

१. बर्फ किंवा आईस्क्रीम खावी :- बर्फात दुखणं आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे बर्फ जिभेवरील सूज आणि जखमेपासून आराम देण्यास लाभदायक ठरु शकतो. बर्फाचा तुकडा जखमेवर सहन होईल तितका वेळ धरुन ठेवा. जीभ चावली किंवा भाजल्यानंतर लगेच त्या भागांवर बर्फाचा खडा चोळावा. बर्फाचा थंडगार खडा चोळल्याने जिभेच्या भाजलेल्या भागाला आराम मिळतो. बर्फाप्रमाणेच भाजलेल्या जिभेची जळजळ रोखण्यासाठी आपण आईस्क्रीम खाण्याचा देखील पर्याय निवडू शकता. 

‘आधी होती माझी फिगर हॉट, पण आई झाल्यानंतर.. ’ -बिपाश बासू सांगते, मम्मा डोण्ट कॉलॅप्स...

२. मिठाच्या पाण्याने करा गुळण्या :- मिठामध्ये सोडियम क्लोराईड असतं जे की जखमेवरील सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत करतं. मिठामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जखमेपासून होणा-या संक्रमणाला दूर ठेवतात. एक कप किंवा एक ग्लास पाण्यास एक चमचा मीठ घाला. त्या मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसातून ४ ते ५ वेळा केल्याने तोंडातील जखम भरुन येण्यास जास्त कालावधी लागणार नाही आणि त्यावरील बॅक्टेरीया देखील निघून जातील.

३. तुळशीच्या पानांचा रस :- तुळशीमध्ये अँटीइन्फ्लामेट्री, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे जिभेवरील फोडांना आणि तोंडातील जखमेला बरं करण्यासाठी तुळशीचा वापर आपण करु शकता. तुळशीची तीन ते चार पानं घेऊन त्यावर मीठ टाकून ती पाने चघळा. तुळशीच्या पानांतून जो रस येईल तो गिळून टाका. ही क्रिया दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने भाजलेली जीभ बरी होण्यास मदत मिळते. 

इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....

४. मध किंवा साखरेमुळे आराम मिळेल :- जर आपली जीभ जळत असेल तर आपण लगेच मध किंवा साखर खाऊ शकता. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, त्यामुळे ते जिभेवर लावल्याने संसर्गाचा धोका दूर होतो. इतकंच नाही तर वेदनांपासूनही आराम मिळतो.

भीती वाटली होती मी ‘तिला’ गमावणार तर नाही! -प्रियांका चाेप्रा सांगते लेकीसाठी काळीज तुटत होतं ते दिवस...

 

५. थंड पाणी प्यावे :- जीभ जळल्यानंतर लगेच थंड पाणी प्यावे. कोल्ड ड्रिंकमुळे जळलेल्या जिभेला त्वरित आराम मिळतो. गरम अन्नपदार्थांमुळे भाजलेल्या  जिभेचा दाह कमी करण्यासाठी आपण थंड पाणी किंवा थंडगार कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा पर्याय निवडू शकता.

Web Title: How To Heal Burnt Tongue 5 Effective Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.