Join us   

FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 2:01 PM

How to identify fake cooking oil? (FSSAI recommended tips) : आपण स्वयंपाक करताना कोणत्या तेलाचा वापर करता? ते खरंच शुद्ध आहे ना?

कोरोना महामारीनंतर लोकांना आपल्या आरोग्याचं महत्व अधिक पटलं आहे (Cooking Oil). आजकाल कमी वयात लोकांना मधुमेह, बॅड कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, यासह हृदयाच्या निगडीत समस्या अधिक वाढतात (Health Tips). गंभीर आजार शरीराभोवती विळखा घालण्यापूर्वी वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे (Kitchen Tips). अनेकदा अपुरी झोप, खाण्याकडे लक्ष न देणे, पौष्टीक नसून प्रोसेस्ड आणि फ्राईड फुड्स खाऊनही वजन वाढू शकते. पण घरगुती पदार्थ हेल्दी असतीलचं असे नाही (FSSAI). स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं तेल हे खरंच आरोग्यदायी आहे का? ही मुख्य गोष्ट आधी तपासणं गरजेचं आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने राजस्थानमधून १८००० लिटर बनावट स्वयंपाकाचे तेल जप्त केले आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात वापरण्यात येणारं तेल हे खरंच शुद्ध आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला आपण घरात वापरत असलेलं तेल असली आहे की नकली हे ओळखायचं असेल तर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी शेअर केलेल्या काही टिप्स फॉलो करा. बनावट तेल ओळखणं सोपं होईल(How to identify fake cooking oil? (FSSAI recommended tips)).

FSSAI नुसार तेलाची तपासणी अशी करा..

FSSAI नुसार, दोन कंटेनरमध्ये २ मिली स्वयंपाकात वापरण्यात येणारं तेल घ्या. दोन्ही कंटेनरमध्ये थोडेसे लोणी घाला. जर तेलाचा रंग बदलला नाही तर ते शुद्ध आहे. तर, भेसळयुक्त तेलाचा रंग लाल होतो.

शरीरात आयर्नची कमतरता? थकवाही जाणवतोय? रोज खा ७ पदार्थ; पावसाळी इन्फेक्शन टाळा

रंग पाहा

स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या तेलाला विशिष्ट रंग असते. जर त्यात भेसळ असेल तर तेलाचा रंग गडद असू शकतो. त्यामुळे तेल खरेदी करताना त्याचा रंग अवश्य पाहा.

गंधावरून बनावट तेल ओळखा

फ्रेश आणि असली तेलाला नैसर्गिक सुगंध असतो. तेल विकत घेतल्यानंतर त्याचा गंध घ्या. जर तेलातून तीव्र गंध येत असेल तर, याचा अर्थ तेलात भेसळ आहे.

चवीकडे लक्ष द्या

स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या तेलाला वेगळीच चव असते. जर आपल्याला नेहमीपेक्षा तेलाची चव वेगळी जाणवली तर, तेल वेळीच बदला.

पॅकेजिंग पाहणे महत्वाचे

तेल खरेदी करताना, त्याच्या पॅकेजिंगकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पॅकेटवर टेम्पर प्रूफ सील आणि एक्सपायरी डेट तपासली पाहिजे. याशिवाय होलोग्रामकडेही लक्ष द्या.

'या' ५ भाज्यांची साली म्हणजे पोषणाचा खजिना, कचरा म्हणून फेकू नका-शरीराला मिळेल भरपूर ताकद

लेबल वाचा

स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या तेलाचे लेबल पाहा. लेबलवर सहसा तेलाचा प्रकार, साहित्य उत्पादन तपशील आणि FSSAI प्रमाणन चिन्ह नमूद केले असते. या सर्व गोष्टी लेबलवर नसतील तर, समजून जा त्यात भेसळ आहे.

टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नहेल्थ टिप्सआरोग्य