Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहानपणीच मुलांची हाडं ठणकतात? हाडांची ताकद टिकून राहण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी 

लहानपणीच मुलांची हाडं ठणकतात? हाडांची ताकद टिकून राहण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी 

Health Tips For Children's Bone: मुलांच्या लहानपणीच काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे. जेणेकरून त्यांची हाडे सुरुवातीपासूनच बळकट होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 06:38 PM2023-01-04T18:38:51+5:302023-01-04T18:39:52+5:30

Health Tips For Children's Bone: मुलांच्या लहानपणीच काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे. जेणेकरून त्यांची हाडे सुरुवातीपासूनच बळकट होतील.

How to improve child's bone health? Food for the strong bones of your children | लहानपणीच मुलांची हाडं ठणकतात? हाडांची ताकद टिकून राहण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी 

लहानपणीच मुलांची हाडं ठणकतात? हाडांची ताकद टिकून राहण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी 

Highlightsमैदानी खेळ न खेळल्याने मुलांच्या हाडांना हवी तशी बळकटी मिळत नाहीये. म्हणूनच त्यासाठी आता पालकांनीच काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

मोठ्या माणसांचे दैनंदिन जीवन जसे बदलले आहे, तसाच बदल लहान मुलांच्या बाबतीतही झाला आहे. मागच्या पिढीचे लहानपण आणि आताच्या पिढीचे लहानपण यात खूप मोठे अंतर आहे. मागच्या पिढीचे बालपण मैदानात गेले, तर आताच्या पिढीचे बालपण मोबाईल आणि टीव्ही यांच्यासमोर  जाते आहे. मैदानी खेळांमुळे आपोआपच मुलांचा स्टॅमिना वाढायचा. अंगातली ताकद वाढायची. पण आता मात्र मुलांमध्ये स्थुलता वाढू लागली आहे. मैदानी खेळ न खेळल्याने मुलांच्या हाडांना हवी तशी बळकटी मिळत नाहीये (How to improve child's bone health?). म्हणूनच त्यासाठी आता पालकांनीच काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.(Food for the strong bones)

मुलांच्या हाडांना बळकटी मिळण्यासाठी...
यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजेत, याची माहिती डॉ. सागर भट्टड यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना दिली आहे. 

कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील
१. व्हिटॅमिन डी
शरीरात कॅल्शियम शोषले जावे, हाडांना बळकटी मिळावी यासाठी व्हिटॅमिन डी अतिशय गरजेचे आहे. पण बहुतांश लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्येही व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसते. त्यामुळे मुले दिवसातून किमान १० ते १५ मिनिटे तरी कोवळ्या सुर्यप्रकाशात बसतील, एवढी काळजी पालकांनी घ्यावी. यावेळी मुलांच्या हाता- पायांना, चेहऱ्याला ऊन लागले पाहिजे.

 

२. कॅल्शियम
मुलांना आहारातून योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळाले पाहिजे. यासाठी त्यांनी नियमितपणे दूध, चीज, दही, पालक, सोयाबीन, भेंडी खायला पाहिजे. मोसंबी हा देखील कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो.  

तब्येतीनुसार कशी करायची कुर्त्यांची निवड? कोणत्या प्रकारच्या कुर्तीमध्ये दिसाल अधिक आकर्षक? बघा ४ टिप्स

३. व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम
हे दोन पदार्थ आणि कॅल्शियम जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते हाडांसाठी उत्तम टॉनिक ठरतात. त्यामुळे व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम देणारे अन्नपदार्थ उदा.- पालक, कोबी, हिरव्या शेंगा आहारात असायला पाहिजेत. 

 

४. व्यायामाची सवय लावा
टीव्ही, माेबाईल बघत एकाच जागी तासनतास बसून राहण्याची मुलांची सवय अतिशय घातक आहे. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. सायकलिंग, रनिंग, स्विमिंग किंवा बॅडमिंटनसारखा एखादा खेळ त्यांनी खेळायलाच हवा, याकडे लक्ष द्या. 
 

Web Title: How to improve child's bone health? Food for the strong bones of your children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.