लहानपणापासून अनेकांना मोठमोठ्या नंबरचा चश्मा लागतो. (Best Foods For Eye Health) चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आणि नजर तीक्ष्ण ठेवण्यासाठी सुरूवातीपासूनच आहाराकडे लक्ष दिलं तर नंतर समस्या उद्भवत नाहीत. (Eyes Health Tips) कमकुवत डोळयांना तीक्ष्ण करण्यासाठी तुम्हाला रोज काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. दैनंदिन जीवनात तुम्ही या गोष्टींचा अवलंब केला तर कोणतंही काम अगदी सहज सोपं होईल. (How to Improve Eye sights Naturally)
संपूर्ण शरीरातील अवयवांप्रमाणे डोळयांना खास महत्व आहे. पोल्यूशन, एलर्जी, डिजिटल डिव्हाईसपासून दूर ठेवणं खूप कठीण असतं. अशावेळी तुम्ही काही आयुर्वेदीक उपाय करून होणारं नुकसान कमी करू शकता. यासाठी लाईफस्टाईलमध्ये काही साधे-सोपे बदल करावे लागतील. (Ayurvedic Medicine For Weak Eyesight And Sharp Vision Told By Ayush Ministry)
नॅशनल आय इंस्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार दृष्टी चांगली राहण्यासाठी वेळेवर जेवण करणं खूप महत्वाचे आहे, नेहमी चालण्याची सवय ठेवा, दृष्टीत बदल झाल्यास त्याबद्दल तज्ज्ञांशी बोला, वेळीच नंबरचा चश्मा वापरा, डोळ्यांना स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवा, सतत फोन, लॅपटॉप न वापरता डोळ्यांना आराम द्या, मद्यपान, धुम्रपानापासून लांबच राहा.
रोज चालता तरी पोट-मांड्या जाडजूड? किती पाऊल आणि कधी चालावं याचं सोपं गणित, मेंटेन व्हाल
जेवल्यानंतर काय करावे?
आयुष मंत्रालयाने सांगितले की जेवल्यानंतर लगेच ओल्या हातांनी डोळ्यांची मसाज करायला हवी. यामुळे नजरेला होणारं नुकसान टाळता येतं. एक्सपर्ट्सच्यामते त्रिफळा काढा डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो. याव्यतिरिक्त त्रिफळा चूर्ण मध आणि तूपासोबत घेतल्यानेही बरेच फायदे मिळतात.
डोळ्यांची स्वच्छता गरजेची
डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही त्रिफळा काढ्याचा वापर करू शकता. सुरूवातीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्रिफळा काढा घेतला तर डोळ्यांचे आजार दूर राहण्यास मदत होईल.
व्हिटामीन बी -१२ साठी स्वस्तात मस्त सुपरफूड, हाडं होतील मजबूत-शाकाहारींसाठी वरदान
नजर तीक्ष्ण करण्याचे उपाय
जर तुम्हाला असं वाटत असेल की दीर्घकाळ तुम्हाला चांगले दिसावे यासाठी डोळ्यांच्या समस्या दूर ठेवू शकता. यासाठी सकाळच्यावेळी तोंडावर पाणी मारून डोळे स्वच्छ करा. यामुळे नजर तीक्ष्ण झालेली दिसून येईल. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी नियमित त्रिफळा, तूप, ज्वारी, गहू, तांदूळ, डाळिंब, शतावरी, मूगाची डाळ या पदार्थांचे सेवन करा.
नजर तीक्ष्ण करण्यासाठी आयुर्वेदीक उपाय
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तळव्यांची मसाज करू शकता. चांगल्या क्वालिटीच्या चपला, बुट वापरा. तळव्यांना आयुर्वेदीक लेप लावा.