सध्याच्या स्थितीत आपल्या आजूबाजूच्या १० पैकी एका माणसाला चश्मा लागलेला असतो. (Eye Care Tips) लहान मुलांना सतत टिव्ही, फोनचा वापर केल्यामुळे तर मोठ्यांना ७ ते ८ तांस पीसी, लॅपटॉपसमोर बसल्यामुळे चश्मा लागतो तर वृद्धांची वयोमानानुसार नजर कमकुवत होते. आपल्या तब्येतीकडे वेळीच लक्ष न दिल्यास डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. (Yoga for eyesight improvement)
जर तुम्ही चश्म्याचा नंबर कमी करू इच्छित असाल तर तुम्ही बिजी शेड्यूलमध्ये ५ ते १० मिनिटं काढून व्यायाम करू शकता. (Easy Exercise for Eyesight) हे सोपे व्यायाम केल्याने काही वेळातच डोळ्यांवरचा ताण कमी होईल आणि नजर सुधारेल. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बीट, गाजर, बदाम या पदार्थांचे सेवन करा. रात्री झोपण्याच्या १ ते २ तास आधी गॅजेट्सपासून लांब राहा
१) क्लॉकवाईज रोटेशन एक्सरसाईज (Clockwise and Anticlockwise Rotation Exercise)
हा व्यायाम करण्यासाठी डोळे एखाद्या पुतळ्याप्रमाणे इकडे, तिकडे फिरवावे लागतील. रोज दिवसभरात १० वेळा हा व्यायाम केल्याने डोकेदुखी आणि डोळे दुखण्याची समस्या दूर होते.
कॅल्शियमने खच्चून भरलेत स्वस्तात मिळणारे ५ पदार्थ; नियमित खा- हाडं होतील बळकट
२) पापण्या मिटून पुन्हा उघडा (Eye Blinking Exercises)
हा व्यायाम करण्यासाठी डोळे उघडा आणि बंद करा. दिवसभरात कमीत कमी ५ ते ६ वेळा हा व्यायाम करा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
३) वर-खाली पाहा ( Up Down Movement Exercise)
डोळ्यांची बुबळं वर-खाली करा आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा मग डोळे वर करा आणि खाली करा. ५ ते १० सेकंदांचा हा व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
ऑफिसमध्ये तासनतास बसून पोट सुटलंय? जागेवरच उभं राहून ३ व्यायाम करा, मेंटेन होईल फिगर
४) पामिंग (Palming Exercise)
पामिंग हा व्यायाम नसून एक रिलॅक्सेशन पोस आहे. हा व्यायाम करताना दोन्ही हात एकमेकांवर घाला. ज्यामुळे हातांवर हिट तयार होईल. नंतर हात डोळ्यांवर ठेवा. हा उपाय केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात ब्लड सर्क्युलेशन चांगले होईल.
5) डावीकडे आणि उजवीकडे पाहा (Left right Eye Movement)
हा व्यायाम करण्यासाठी एका ठिकाणी शांतपणे बसा. त्यानंतर डोळे एकदा डाव्या बाजूला मग उजव्या बाजूला फिरवा. ३ ते ४ वेळा हा व्यायाम केल्यास डोळे चांगले राहण्यास मदत होईल.