Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

How To Increase Eyesight : डॉक्टर सांगतात की काही घरगुती उपाय केल्यास ४० दिवसांत चांगला परिणाम दिसून येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:07 PM2024-10-18T12:07:27+5:302024-10-18T17:42:40+5:30

How To Increase Eyesight : डॉक्टर सांगतात की काही घरगुती उपाय केल्यास ४० दिवसांत चांगला परिणाम दिसून येईल.

How To Increase Eyesight : Ayurvedic Doctor Claimed Remedy To Increase Eye Sight And Vision With Badam Saunf | लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

लांबची नजर कमजोर झाली, धूसर दिसतं? डॉक्टर सांगतात खास उपाय-डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

नजर कमजोर होण्याची समस्या खूपच कॉमन आहे. आधीच्या काळी वयस्कर लोकांना ही समस्या जाणवायची पण आता लहान मुलांच्याही डोळ्यांवर चष्मा दिसून येतो. (Health Tips)   डॉ. निशांत गुप्ता यांच्या हेल्थ टिप्स डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतील. (How to Get Rid of Spectacles Naturally) त्यांच्या म्हणण्यानुसार काही घरगुती उपाय केल्यास ४० दिवसांत चांगला परिणाम दिसून येईल. (How To Increase Eyesight)

प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार दृष्टी सुधारण्यासाठी आहारात  व्हिटामीन के, सी, ई युक्त पदार्थ, झिंक, सेलेनियम असलेल्या पदार्थांचा समावेश करा. स्क्रिन टाईम कमी करून  २०-२०-२० चा फॉर्म्यूला वापरा. स्वत:ला हायड्रेट ठेवा जास्तीत जास्त पाणी प्या.  डोळ्यांची स्वच्छता राखा आणि बाहेर जाताना डोळ्यांवर चष्मा लावायला विसरू नका. नाकाचे व्यायाम करा, चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा.

डोळे चांगले ठेवण्यासाठी घरगुती उपाय

१) बदाम- १०० ग्राम

२) बडिशेप - ५० ग्रॅम

३) काळी मिरी- २५ ग्राम

४) खडीसाखर- २५ ग्राम

या चारही वस्तू वाटून घ्या. नंतर  ही पावडर अर्धा अर्धा चमचा सकाळी आणि संध्याकाळी दुधासोबत घ्या. रात्री पहिला उपाय केल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासानं दुसरा उपाय करायचा आहे. यात थोडं त्रिफळा पावडर घ्या आणि मध मिसळून घ्या. ही चटणी तयार  झाल्यानंतर याचे सेवन करा. डॉक्टरांच्या मते हा उपाय डोळ्यांच्या  आजारांपासून बचाव करण्यासाठी उत्तम आहे. 


डोळे चांगले ठेवण्यासाठी लाल रंगाची फळं आणि भाज्या खा, हिरव्या पालेभाज्या खा,  स्मोकींग टाळा, बाहेर पडताना सनग्लासेस वापरा, स्क्रिन वापरताना मध्येमध्ये ब्रेक घ्या, रेग्युलर स्क्रिनिंग करा.

Web Title: How To Increase Eyesight : Ayurvedic Doctor Claimed Remedy To Increase Eye Sight And Vision With Badam Saunf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.