Join us   

हिमोग्लोबिन कमी झालंय? घ्या ५ पदार्थांची यादी; रोज खा, वाढेल रक्त-अशक्तपणा होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 6:32 PM

How to increase Hemoglobin : व्हिटॅमिन ए मुळे लोहाचे शोषणही वाढते.  याशिवाय गाजर, रताळे, आंबा इत्यादींमध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात आढळते.

रक्त आपल्या शरीराच्या कार्यासाठी एक मुख्य घटक आहे. शरीराला पोषक तत्व, हार्मोन्स पोहोचवण्यासाठी आणि घातक पदार्थ  बाहेर काढून राहण्यासाठी रक्त व्यवस्थित तयार होणं गरजेचं असतं. यातील हिमोग्लोबिन हा फार महत्वाचा घटक आहे. हिमोग्लोबिनमुळेच शरीरातील तापमान नियंत्रणात राहते हिमोग्लोबिन ऑक्सिजन रिलिज करण्यातही फायदेशीर ठरते.(Health iron folate rich food vitamin a and c raise hemoglobin count in men and women instantly)

रक्तात हिमोग्लोबिन कमी झाले तर त्याचा  परिणाम ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर होतो आणि शरीराच्या इतर भागांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही. हिमोग्लोबिनच्या कमतरतेनं एनिमियासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. यामुळे थकवा आणि कमकुवतपणा वाटतो. काही पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करून तुम्ही हिमोग्लोबिनची कमतरता दूर करू शकता. 

हिमोग्लोबिन किती असावं

मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, निरोगी पुरुषांमध्ये प्रति डेसीलीटर रक्तातील 13.5 ग्रॅम हिमोग्लोबिन आणि निरोगी स्त्रीमध्ये 12 ग्रॅम हिमोग्लोबिन प्रति डेसीलिटर रक्त असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी असल्यास अॅनिमिया होऊ शकतो.

१) शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते तेव्हा लोहयुक्त पदार्थांचे सेवन वाढवावे. लोहासाठी ऑर्गेनिक पदार्थ फ्लॉवर, केळी, पालक, बीन्स, कोबी, मसूर, टोफू, भाजलेले बटाटे, फोर्टिफाइड तृणधान्ये यांचे सेवन वाढवावे.

२) फोलेट  हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढवते. जेव्हा तुमच्या शरीरात फोलेट नसते तेव्हा हिमोग्लोबिनच्या पेशी परिपक्व होत नाहीत.

३) पालक, हिरवे वाटाणे, एवोकॅडो, मसूर, तांदूळ, राजमा इत्यादींचे फॉलेटसाठी सेवन करावे.

३) व्हिटॅमिन ए मुळे लोहाचे शोषणही वाढते.  याशिवाय गाजर, रताळे, आंबा इत्यादींमध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात आढळते.

४) जर लोहाची कमतरता आहाराने पूर्ण होत नसेल तर आयर्न सप्लिमेंट्सही घेता येतात. जास्त प्रमाणात लोह सप्लिमेंट घेणे हानिकारक असू शकते. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन केले तर बरे होईल.

टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य