Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर

अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर

How to increase hemoglobin: Home remedies : हिमोग्लोबिनची पातळी वाढेल - फक्त ४ पदार्थ खायला विसरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 02:56 PM2024-05-25T14:56:43+5:302024-05-26T10:13:33+5:30

How to increase hemoglobin: Home remedies : हिमोग्लोबिनची पातळी वाढेल - फक्त ४ पदार्थ खायला विसरू नका

How to increase hemoglobin: Home remedies | अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर

अंगात रक्त कमी झालं हे कसं ओळखाल? हिमोग्लोबीन वाढवणारे ४ पदार्थ; अशक्तपणा होईल दूर

शरीरात हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) कमतरतेमुळे ॲनिमियाची समस्या उद्भवू शकते. चक्कर येणे, अशक्तपणा, भूक न लागणे ही शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याची लक्षणे आहेत (Health Tips). हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त प्रथिन आहे, जे रक्ताला लाल रंग देते आणि शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. पण मग शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास काय करावं? कोणते पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते? याची माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली कुमार यांनी दिली आहे(How to increase hemoglobin: Home remedies).

रक्त वाढवण्यासाठी आवश्यक पोषक घटक कोणते ?

आयर्न

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोह महत्त्वाची भूमिका बजावते. लोह शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात.

मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

व्हिटॅमिन बी १२

लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सच्या निर्मितीसाठी; व्हिटॅमिन बी१२ युक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. कारण व्हिटॅमिन बी १२ हे पोषक तत्व शरीर तयार करू शकत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन बी १२युक्त पदार्थांचे सेवन करायला हवे.

फॉलिक अॅसिड

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात फॉलिक अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा. कारण यामुळे शरीरात लाल रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होईल, ज्यामुळे ॲनिमियाची समस्या दूर होऊ शकते.

प्रोटीन

प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. मुख्य म्हणजे प्रोटीन रिच फुड्समध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असल्याकारणाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. 

शरीरात हिमोग्लोबिन वाढवणारे शाकाहारी पदार्थ

दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

लोहयुक्त पदार्थ- पालक आणि सर्व हिरव्या पालेभाज्या, डाळी, चणे, टोफू, भोपळ्याच्या बिया, सफरचंद, केळी, खजूर.

व्हिटॅमिन बी १२ - यामध्ये आपण डेअरी उत्पादने, फोर्टिफाइड तृणधान्ये, चीजचा आहारात समाविष्ट करू शकता.

फॉलिक ॲसिड- हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, लिंबूवर्गीय फळे, संपूर्ण धान्ये यांचे सेवन करा.

प्रथिने- प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करण्यासाठी आपल्या आहारात चीज, डाळी, क्विनोआ, ग्रीक दही यांचा समावेश करा.

Web Title: How to increase hemoglobin: Home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.