Join us   

हिमोग्लोबिन खूप कमी झालं? ५ पदार्थ खा, हिमोग्लोबिन वाढेल भराभर आणि एनर्जीही मिळेल भरपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:30 AM

How to Increase Hemoglobin Level Quickly : जेव्हा हिमोग्लोबीनची पातळी कमी होते तेव्हा थकवा, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात.

धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिमोग्लोबीन एक आयर्नयुक्त प्रोटीन आहे. ज्यामुळे शरीराच्या रक्ताच्या पेशी तयार होतात. जेव्हा हिमोग्लोबीनची पातळी कमी होते तेव्हा थकवा, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात. (Food for iron) शरीरात रक्त कमी झाल्यास एनिमियाचा त्रास होऊ शकतो. एनिमिया हा आजार भारतातील सर्वाधिक महिलांना होतो (Foods That May Help Increase Hemoglobin)

सर्वेक्षणानुसार लाखो भारतीय महिला आणि लहान मुलं या आजाराने पिडीत आहेत. रक्ताची कमतरता भासल्यास रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे हिमोग्लोबीन वाढेल अमेरिकन रेड ब्लड सोसायटीने कोणत्या भाज्यांमध्ये सर्वाधिक लोह असते. याबाबत अहवाल प्रकाशित केला आहे. (How to increase hemoglobin level quickly)

1) बीट हा हिमोग्लोबीन वाढवण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. पोटॅशियम, फायबर्स यासोबत फॉलिक एसिडसुद्धा असते म्हणून बीटाच्या रसाचा आहारात समावेश करा.  2) रक्त कमी असलेल्यांसाठी दुधीची भाजी  हा उत्तम पर्याय आहे. दुधीच्या रसाचे सेवन रक्त वाढवण्यासाठी  चांगले असते. यात आयर्न आणि पोटॅशियम असते.

पोटाची चरबी घटवायची, पण व्यायाम नको? ५ फळं खा, झरझर घटेल चरबी-फिट, स्लिम दिसाल

3) उपवासाच्या वेळी रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ले  जातात.  अर्धा कप रताळ्यांमध्ये २१५ मिलिग्राम आयर्न असते. याव्यतिरिक्त यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. रताळ्याचा शिरा, रताळ्याची  भाजी किंवा तुम्ही उकडलेले रताळे खाऊ शकता. 

4) कोलार्ड ग्रीन व्हिटमीन ए, व्हिटामीन सी आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. यात व्हिटामीन, आयर्न, व्हिटामीन बी-६ आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. कोलार्ड ग्रीन्समध्ये जवळपास ५० कॅलरीज असतात यातून  २१२ मिलीग्राम आयर्न मिळते.

बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

5) रक्ताची कमतरता असल्यास आहारात पालकाचा समावेश करा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होईल. फॉलेटचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे रेड ब्लड सेल्स बनवण्यास मदत होते. पालकाची भाजी, सूप, पराठा यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स