Join us   

पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवणारे ५ पदार्थ; लाइफस्टाइल आणि आहाराची घ्या योग्य काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 5:52 PM

How To Increase Male Fertility : आज पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अनेक वैद्यकीय उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ते बनवताना रसायनांचाही वापर केला जातो, त्यामुळे दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

प्रत्येक व्यक्तीला  एक दिवस वडील व्हायचे असते. मात्र, अयोग्य आहार, मद्यपान आणि अपुरी झोप यामुळे पुरुषांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. अर्न्स्ट अँड यंगच्या 2015 च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील 10 ते 12 टक्के जोडप्यांना पुरुष वंध्यत्वामुळे बाळंतपणात अडचणी येतात. (How To Increase Male Fertility)

आज पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अनेक वैद्यकीय उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ते बनवताना रसायनांचाही वापर केला जातो, त्यामुळे दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच 5 औषधी वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे नियमित सेवन केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढू शकते. (Herbs to increase male fertility)

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि सांगितले आहे की पुरुष 100% नैसर्गिक पद्धतीने प्रजनन क्षमता कशी वाढवू शकतात. 

पुरूषांची प्रजनन क्षमता कमी होण्याची कारणं

अधिक व्यायाम, ताण, धूम्रपान, लठ्ठपणा, संसर्ग, मधुमेह, खराब पोषण, हार्मोनल असंतुलन, जननेंद्रियाचे रोग

फर्टिलिटी वाढवणारे ५ हर्ब्स

1) गाईचं दूध

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी पुरुषांना गायीचे तूप किंवा शुद्ध देशी तूप नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तुपामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे पुरुषांना ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. तुपात फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे लैंगिक आरोग्य सुधारतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. पुरुषांना दररोज 2 ते 3 चमचे गाईचे तूप खाण्याचा सल्ला दिला जातो.

2) भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आढळते. दररोज भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. झिंक शुक्राणूंचे नुकसान देखील कमी करते. भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे टेस्टोस्टेरॉनची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करतात.

3) त्रिफळा आणि जायफळ

पुरुषांना प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी त्रिफळा आणि जायफळाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्रिफळा सेवन केल्याने हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत होते. याचा उपयोग नैराश्य आणि चिंता यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

4) आवळा

पुरुषांना प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. आवळा अँटिऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढते. अशा स्थितीत शुक्राणू अंड्याकडे अधिक वेगाने सरकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. पुरुषांना आठवड्यातून 3 ते 4 दिवस कच्चा आवळा किंवा आवळा मुरब्बा खाण्याचा सल्ला दिला जातो.

5) अश्वगंधा

पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी, अश्वगंधा सेवन करण्याची शिफारस केली जाते. अश्वगंधा अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. यासोबतच अश्वगंधा फायबर, प्रोटीन, एनर्जी, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी यांचा चांगला स्रोत मानले जाते. अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने मज्जासंस्थेची कार्यक्षमता सुधारते आणि शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

6) आहार

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी पुरुषांनी या सगळ्यांसोबतच त्यांच्या नियमित आहाराकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं डॉक्टर सांगतात.  पुरुषांनी ताजी, सेंद्रिय फळे आणि भाज्या, नारळ, दूध, बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, अंजीर, खजूर यांसारख्या ड्रायफ्रुट्सचा  आहारात समावेश करावा. या सर्व गोष्टी शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य