Join us   

थंडीच्या दिवसांत आवर्जून खा ४ गोष्टी; हिवाळा बाधणार नाही- तब्येत ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2022 4:27 PM

How to keep body warm in winters : थंडीच्या दिवसांत कोणते पदार्थ खाल्लेले आरोग्याच्या दृष्टीने चांगले याविषयी समजून घेऊया...

ठळक मुद्दे थंडीच्या दिवसांत सुकामेवा खाणे अतिशय फायदेशीर असते.        अन्न शिजवण्याबरोबरच अन्नपदार्थांवर वरुन घेण्यासाठीही तूपाचा उपयोग होतो. 

थंडीचे दिवस म्हणजे कुडकुडवणारे आणि तरीही तब्येत ठणठणीत करण्यासाठीचे. या काळात भरपूर खाऊन, व्यायाम करुन वर्षभरासाठी तब्येत चांगली राहावी यासाठी नियोजन केले जाते. थंडीच्या दिवसांत भाज्या, फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने या काळात खाण्यापिण्याची चंगळ असते. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसांत खाल्लेले सहज चांगले पचते. या मात्र याच काळात थंडी, ताप किंवा सर्दी होण्याचीही शक्यता असते. अशावेळी ऊब मिळण्यासाठी किंवा शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नेमके काय खायला हवे याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत कोणते पदार्थ खाल्लेले आरोग्याच्या दृष्टीने चांगले याविषयी समजून घेऊया (How to keep body warm in winters)...

१. गरमागरम सूप

भाज्या किंवा डाळी यांचे सूप थंडीच्या दिवसांत अतिशय फायदेशीर असते. थंडी पळवण्यासाठी गरम सूप हा अतिशय चांगला पर्याय आहे. यामध्ये फक्त मीठ, मिरपूड घातली तरी हे सूप अतिशय चांगले लागते. सूपामुळे शरीराला एनर्जी तर मिळतेच पण गरम असल्याने सर्दी किंवा कफ कमी होण्यासाठीही त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

२. तूप 

तूप हा अनेकांच्या आवडीचा आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे. तूप हे आपण पोळी, डाळ, पराठा, भात अशा कोणत्याही गोष्टीसोबत खाऊ शकतो. अन्न शिजवण्याबरोबरच अन्नपदार्थांवर वरुन घेण्यासाठीही तूपाचा उपयोग होतो. 

(Image : Google)

३. आलं 

आलं हे कंदमूळ असून तो उष्णपदार्थ आहे. आयुर्वेदतही आल्याचे बरेच महत्त्व सांगितले असून आलं किंवा सूंठ पूड अनेक विकारांसाठी उपयुक्त ठरते. शरीराचा रक्तप्रवाह वाढवून शरीर गरम ठेवण्यासाठी आले अतिशय उपयुक्त ठरते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत चहामध्ये किंवा पाण्यामध्ये आलं घालून प्यायले जाते. 

४. सुकामेवा

हेल्दी फॅटससाठी उत्तम स्त्रोत असलेला सुकामेवा आहारात जरुर असायला हवा. अगदी थोड्या प्रमाणात ड्राय फ्रूटस खाल्ले तरी आपल्याला बरीच एनर्जी मिळते. सुकामेव्यातील काही गोष्टींपासून शरीराला बऱ्याच प्रमाणात लोह मिळते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सुकामेवा खाणे अतिशय फायदेशीर असते.          

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स