महिलांच्या हाडांची ताकद वाढवणाऱ्या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती आपण सतत पाहत असतो. चाळीशीमध्ये महिलांची हाडे खिळखिळी होतात. (how to keep bones strong 4 tips for women, don't ignore bone pain)असे दावे या जाहिराती करत असतात. अनेक फार्मा कंपनी महिलांच्या हाडांच्या मजबुतीसाठी प्रॉडक्ट लॉन्च करतात. कारण हे सत्य आहे की, महिलांच्या हाडांची मजबुती हळूहळू कमी होते. असे का होते त्याचे कारण जाणून घेणे प्रत्येक महिलेसाठी फार गरजेचे आहे. कारण फक्त चाळीशी नंतरच हाडे कमकुवत होतात असे नसून आपली हाडे चाळीशीच्या आधीपासूनच कमकुवत व्हायला सुरवात होते. त्यामुळे मग काम करताना थकवा जाणवतो.(how to keep bones strong 4 tips for women, don't ignore bone pain) दम लागतो. काहीही उचलताना वाकवतही नाही. ही समस्या वाढतच चाललेली आहे, असे डॉ. हंसाजी योगेंद्र तसेच डॉ.एच.एस चंद्रिका यांनी त्याच्या चॅनलवर सांगितले आहे.
ऑस्टियोपोरोसिस या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये वाढत चालले आहे. या आजारामध्ये हाडांची झीज होते. तसेच हाडांचा आकार कमी होतो त्यामुळे हाडे कमकुवत होतात. हाडे तुटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. खास म्हणजे मेनोपॉज दरम्यान महिलांमधील इस्ट्रोजेनचे प्रमाण बरेच घटते. हाडांची ताकद राखण्याचे काम हे इस्ट्रोजेन करत असते. तेच कमी झाल्यावर हाडांवर परिणाम होणे साहाजिक आहे. ही झीज थांबण्यासाठी काही उपाय आहेत, जे प्रत्येक महिलेने करायला हवेत.
१. रोज सकाळी एक ग्लास लिंबू व सब्जा यांचे मिश्रण केलेले पाणी प्यावे. सब्जामध्ये मॅग्नेशिअम असते आणि लिंबामध्ये जीवनसत्त्व 'सी' भरपूर असते. ताकद वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
२. इस्ट्रोजेन जरी कमी झाले तरी शरीरातील कॅल्शियम कमी होऊ द्यायचे नाही. कॅल्शियम देणार्या पदार्थांचा आहारात समावेश करायचा. दही खा. पनीर खा. हिरव्या भाज्या खात जा. सकाळच्या कोवळ्या ऊन्हाचाही उपयोग होतो.
३. झोपण्यापूर्वी रोज रात्री एक ग्लास दूध पिणे अत्यंत गरजेचे आहे. दुधामध्ये अनेक गुणधर्म असतात. झोपण्याआधी प्यायल्याने रात्रभरात शरीराला जेव्हा आराम मिळतो तेव्हा दुधामधील पोषण रक्तामध्ये मिसळते.
४. एकपादासन, नटराजासन, वर्जासन अशी योगासने रोज करा. शरीराची लवचिकताही चांगली राहील तसेच हाडे मजबूत राहतील.