Join us   

कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं तर आहारात करा ४ सोपे बदल; हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 12:33 PM

How To Keep Control on Cholesterol Diet Tips : कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमद्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि हृदयाच्या कार्यात अडथळा येतो.

ठळक मुद्दे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी आहारात वेळीच बदल करायला हवेतहृदयाच्या कार्याला अडथळा पोहचवणारे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

शरीराचे कार्य योग्य पद्धतीने चालायचे असेल तर प्रत्येक घटकाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते वाढू न देणे आवश्यक असते. कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमद्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि हृदयाच्या कार्यात अडथळा येतो. असे होऊ नये म्हणून वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली (How To Keep Control on Cholesterol Diet Tips).

चरबीयुक्त आहार, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या गोष्टींमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. काहीवेळा ही समस्या अनुवंशिकतेमुळेही उद्भवते. मात्र संतुलित जीवनशैलीच्या मदतीने ही समस्या कमी करता येऊ शकते. त्यासाठीच आहारात काही बदल करण्याची आवश्यकता असते. वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही. यासाठीच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहावे यासाठी काही खास टिप्स देतात. त्या कोणत्या पाहूयात..

(Image : Google)

१. आहारात मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असलेल्या तेलांचा समावेश करा. म्हणजेच तीळाचे तेल, मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑईल हे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी फायदेशीर असते. 

२. दिवसभराच्या आहारात फळं, भाज्या यांचे प्रमाण वाढवा. दिवसभरात किमान ४ ते ५ वेळा फळं आणि भाज्या आहारात असायला हवीत. 

३. सोल्यूबल फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवायला हवा. यामध्ये पालेभाज्या, ओटस, डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश असायला हवा. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. व्हिटॅमिन इच्या सप्लिमेंटसचा आहारात समावेश करायला हवा, जेणेकरुन बॅड कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन कमी होण्यास मदत होते.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयरोगआहार योजना